Cricket : भारत-ऑस्ट्रेलिया टेस्टनंतर विंडीज दौऱ्यासाठी टीम जाहीर, पहिला सामना कधी?

T20i and Odi Series : ऑस्ट्रेलिया वूमन्स क्रिकेट संघ टीम इंडियाला मायदेशातील एकमेव कसोटी सामन्यांत पराभूत केल्यानंतर आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे.

Cricket : भारत-ऑस्ट्रेलिया टेस्टनंतर विंडीज दौऱ्यासाठी टीम जाहीर, पहिला सामना कधी?
Test Cricket
Image Credit source: Bcci
| Updated on: Mar 12, 2026 | 1:24 AM

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-1 ने विजय मिळवून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची विजयी सुरुवात केली. वुमन्स टीम इंडियाची ऑस्ट्रेलियात कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलिया महिला संघाने जोरदार कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला. त्यामुळे टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात एकमेव कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट विजयाने करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. मात्र टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट करण्यात अपयशी ठरली.

ऑस्ट्रेलिया वूमन्सचा वेस्ट इंडिज दौरा

यजमान ऑस्ट्रेलिया वूमन्स क्रिकेट टीम मायदेशातील या मालिकेनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध 19 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. सोफी मोलिनेक्स ही टी 20i आणि एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत.

उभयसंघात 19 ते 23 मार्च दरम्यान टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 27 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान वनडे सीरिजचा थरार रंगणार आहे. सोफी मोलिनेक्स हीचं या दौऱ्यातून संघात कमबॅक झालं आहे. सोफी मोलिनेक्स हीला टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. तसेच ऑलराउंडर एनाबेल सदरलँड हीला विश्रांती देण्यात आली आहे. आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला काही महिने बाकी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सदरलँड हीला विश्रांती देण्यात आली आहे.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, गुरुवार, 19 मार्च.

दुसरा सामना, शनिवार, 21 मार्च.

तिसरा, सोमवार, 23 मार्च.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, शुक्रवार, 27 मार्च.

दुसरा सामना, रविवार, 29 मार्च.

तिसरा सामना, गुरुवार 1 एप्रिल.

वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी 20i आणि वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : सोफी मोलिनेक्स (कॅप्टन),डार्सी ब्राउन, निकोला कॅरी, ऐश गार्डनर, किम गर्थ, लुसी हॅमिल्टन, अलाना किंग, फोबे लिचफील्ड, ताहलिया मॅकग्राथ, बेथ मूनी, एलीस पेरी, मेगन शट, जॉर्जिया वोल, जॉर्जिया वेयरहम आणि ताहलिया विल्सन.

Follow Us