AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

82 चेंडूत सामन्याचा The End! अवघ्या 35 धावांवर सर्व खेळाडू तंबूत, आठ खेळाडूंना खातही खोलता आलं नाही

वुमन्स कॉन्टिनेंटल कप 2026 मध्ये ऑस्ट्रिया आणि तुर्की यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रियाचा संघ 35 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात आंतरराष्ट्रीय महिला टी20 क्रिकेटच्या इतिहासातील नकोसे आणि लज्जास्पद विक्रम नोंदवले गेले आहेत.

82 चेंडूत सामन्याचा The End! अवघ्या 35 धावांवर सर्व खेळाडू तंबूत, आठ खेळाडूंना खातही खोलता आलं नाही
82 चेंडूत सामन्याचा The End! अवघ्या 35 धावांवर सर्व खेळाडू तंबूत! आठ खेळाडूंना खातही खोलता आलं नाहीImage Credit source: video grab
| Updated on: Aug 27, 2026 | 3:19 PM
Share

वुमन्स कॉन्टिनेंटल कप 2026 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रिया आणि तुर्की हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात तुर्की महिला संघाने नाणेफेक जिंकली आणि कर्णधार कुब्रा कानावार्सी हिने प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असंच म्हणावं लागेल. कारण ऑस्ट्रियाचा संपूर्ण संघ 35 धावांमध्ये गुंडाळण्यात तुर्कीला यश आलं. ऑस्ट्रियाच्या 8 फलंदाजांना खातंही खोलता आलं नाही. एका डावात 8 खेळाडू शून्यावर बाद होण्याची ही दुर्मिळ आणि नकोशी घटना होती. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात जास्तीत जास्त 7 फलंदाज शून्यावर बाद झाले होते. इतकंच काय तर संपूर्ण संघाने मिळून केलेल्या धावांपेक्षा विरोधी संघाने फुकट दिलेल्या धावा जास्त आहेत. ऑस्ट्रियाच्या सर्व फलंदाजांनी मिळून फक्त 16 धावा केल्या, तर तुर्कीच्या गोलंदाजांनी 19 धावा अवांतर दिल्या. संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कोमती रेड्डीने सर्वाधिक 8 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रियाच्या फक्त तीन फलंदाजांना धावा करता आल्या. यात कोमती रेड्डीने 8, हादिया सिद्दीकने 3 आणि शितल भारद्वाजने 5 धावांची खेळी केली. या तिन्ही फलंदाजांना एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागलं. तुर्कीची गोलंदाज हसेर चेलिक हिने 2 षटकांत अवघ्या 6 धावा देत 4 बळी घेतले. कर्णधार कुब्रा कानावार्सी हिने 2 षटकांत 5 धावा देत 3 बळी घेतले. एझगी नूर किलीसने दोन विकेट काढल्या. तर ऑस्ट्रियाची फलंदाज आशी चोप्रा ही तुर्कीच्या गुलहातून केलेस हिच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे एकही चेंडू न खेळता धावबाद झाली.

  • कोमती रेड्डी: 8 धावा (19 चेंडू)
  • शीतल भारद्वाज: 5 धावा (13 चेंडू)
  • हादिया सिद्दीकी: 3 धावा (5 चेंडू)
  • प्रिया साबू (कर्णधार) – 0 ( 2चेंडू)
  • आशी चोप्रा – 0 (2 चेंडू)
  • अश्मान सैफी – 0 (0 चेंडू)
  • प्रविथा गणेशन – 0 (2 चेंडू)
  • प्रिथा गणेशन – 0 (2 चेंडू)
  • वेरा पोग्लित्श – 0 (2 चेंडू)
  • अंजुमन हिरा – 0 (1 चेंडू)
  • महादेवा पाथिरान्नेहेलागे – 0 (1 चेंडू)

ऑस्ट्रियाचा संपूर्ण संघ 8.1 षटकात म्हणजेच 49 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. तर तुर्कीने विजयासाठी मिळालेलं आव्हान अवघ्या 5.3 षटकात म्हणजेच 33 चेंडूत 2 गडी गमवून पूर्ण केलं. दोन्ही डावात मिळून हा सामना 13.4 षटकात म्हणजेच 82 चेंडूत संपला. वेळेच्या आणि चेंडूंच्या हिशोबाने हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात जलद संपलेल्या सामन्यांपैकी एक ठरला आहे.

Follow Us
सतेज पाटील आणि भाजप समर्थक शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक
Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार