AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : भर रस्त्यात बाबर आझम भडकला, धक्काबुक्की करत हाणामारीपर्यंत मारली मजल

बाबर आझमचे दिवस फिरले आहेत. क्रिकेटमध्ये फॉर्म गवसत नाही, त्यात चाहत्यांकडून वारंवार ट्रोल केलं जात आहे. असं असताना बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात बाबर आझम धक्काबुक्की करताना दिसत आहे.

Video : भर रस्त्यात बाबर आझम भडकला, धक्काबुक्की करत हाणामारीपर्यंत मारली मजल
बाबर आझम वादImage Credit source: video grab
| Updated on: Jun 01, 2025 | 7:53 PM
Share

पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझम याच्यासाठी सध्या वाईट काळ सुरु आहे. क्रिकेट मैदानात फॉर्मसाठी झुंजत आहे. पण अजूनही सूर गवसत नाही. त्यामुळे कर्णधारपद गमवावं लागलं. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी संघातून डावलण्यात आलं आहे. त्यामुळे त्याची मनस्थिती विचित्र झाली आहे. दुसरीकडे, मैदानाबाहेर बाबर आझम आणि वाद हे समीकरण तयार झाला आहे. बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात बाबर आझम लाहोरच्या रस्त्यावर वाद घालताना दिसत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ही घटना लाहोरची आहे. शुक्रवारी बाबर आझम एका मशिदीच नमाज अदा करण्यासाठी आला होता. नमाज पठण करून बाहेर पडल्यानंतर काही लोकांनी त्याच्यासोबत व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. बाबरने तसं करण्यापासून त्यांना रोखलं. पण तरी त्यांनी त्याचं काही ऐकलं नाही. त्यामुळे बाबर आझमला राग अनावर झाला.

बाबर आझम व्हिडीओ शूट करत असलेल्या लोकांकडे वळला आणि वाद सुरू केला. हा वाद इतका विकोपाला गेला की हाणामारीपर्यंत स्थिती पोहोचली. बाबरच्या टीशर्ट पकडण्याचा एकाने प्रयत्न केला. तेव्हाच बाबर आझम वळला आणि त्याने खांद्याने त्या व्यक्तीला धक्का दिला. बाबर आझम रस्त्यावर अशा पद्धतीने वाद घालत असल्याचं पाहून गर्दी जमा झाली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. आता व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाबर आझम आणि वाद हे गेल्या काही दिवसांपासून समीकरण बनलं आहे. मैदानाबाहेरील त्याच्या वर्तनाने त्याच्या व्यक्तिमत्वावर वाईट प्रभाव पडत आहे.

बाबर आझम नमाज अदा करताना त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बाबर आझम भडकला होता. नमाज पठण करताना व्हिडीओ शूट करण्यावर बाबरने आक्षेप घेतल्याचं बोललं जात आहे. पण प्रकरण फार काही पुढे गेलं नाही. काही वेळातच बाबर आझम गाडीत बसून निघून गेला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.