AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BPL 2026: बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धा स्थगित! क्रिकेट बोर्डाचा आपल्याच खेळाडूंना दे धक्का

Bangladesh Premier League 2025/26: बांग्लादेश क्रिकेटमध्ये बरीच उलथापालथ सुरू आहे. वादविवाद आणि बरंच काही घडत आहे. असं असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धा स्थगित केलं. हा निर्णय खेळाडूंच्या विरोधानंतर घेतला गेला आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे फायनान्स कमिटी चेअरमन नजमुल इस्लामच्या वक्तव्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

BPL 2026: बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धा स्थगित! क्रिकेट बोर्डाचा आपल्याच खेळाडूंना दे धक्का
BPL 2026: बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धा स्थगित! क्रिकेट बोर्डाचा आपल्याच खेळाडूंना दे धक्काImage Credit source: BPL
| Updated on: Jan 15, 2026 | 8:25 PM
Share

Bangladesh Premier League 2025/26: बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. खेळाडूंनी या स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. ही स्पर्धा होणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने एक पाऊल पुढे टाकतं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. बांगलादेशी खेळाडूंच्या विरोधामुळे आणि बहिष्कारास्त्रामुळे लीग स्पर्धा होईल की नाही याबाबत शंका होती. 15 जानेवारी 2026 रोजी चटगांव रॉयल्स आणि नोआखाली एक्स्प्रेस यांच्यात सामना होणार होता. पण दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरलेच नाही. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे फायनान्स कमिटी चेअरमन नजमुल इस्लाम यांच्या वादग्रस्त विधानानंतर वादाची ठिगणी पडली होती. त्यांच्या विधानामुळे खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नजमुल इस्लाम यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी निषेध केला.

नजमुल यांनी सांगितलं होतं की, बागंलादेशचा संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात गेला नाही तरी बोर्डाला काहीच फरक पडणार नाही. फार तर खेळाडूंचं आर्थिक नुकसान होईल. त्यांना मॅच फी मिळणार नाही. इतकंच काय तर खेळाडूंना भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना भरपाई का द्यावी. जर ते कुठे जाऊन काहीच करणार नाहीत, तर त्यांच्या पाठी खर्च केलेले कोट्यवधि रुपये ते परत करतील का? आम्ही ते मागणार का? बोर्डाशिवाय खेळाडूंना जगणे कठीण होईल.

बांग्लादेश क्रिकेटर असोसिएशन ऑफ बांगलादेशने नजमुल इस्लाम यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेपूर्वी नजमुल इस्लाम यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर क्रिकेट खेळणार नाही, असा पवित्रा खेळाडूंनी घेतला होता. त्याचाच भाग म्हणून 15 जानेवारीला होणाऱ्या सामन्यासाठी खेळाडू मैदानात गेलेच नाहीत. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. बीसीबीने नजमुल इस्लाम यांना सर्व जबाबदाऱ्यांमधून मोकळं केलं आहे. दुसरीकडे, CWAB अध्यक्ष मोहम्मद मिथुन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, खेळाडू लेखी हमीशिवाय मैदानात उतरणार नाहीत.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!