AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना नो-बॉल, ना वाईड… चेंडू स्टंपवर आदळला, बेल्स उडाल्या, तरीही फलंदाज नाबाद! नेमकं कारण काय?

Afghanistan vs Zimbabwe News: झिम्बाब्वेचा फलंदाज क्लीन बोल्ड झाला. चेंडू नो-बॉल नव्हता. तरीही अफगाणिस्तानला विकेट नाकारण्यात आली. याचे कारण समोर आले आहे.

ना नो-बॉल, ना वाईड... चेंडू स्टंपवर आदळला, बेल्स उडाल्या, तरीही फलंदाज नाबाद! नेमकं कारण काय?
| Updated on: Oct 20, 2026 | 10:53 PM
Share

क्रिकेटच्या मैदानावर चेंडू स्टंपला लागून बेल्स विखुरल्या जातात आणि तरीही फलंदाज बाद होत नाही, तेव्हा आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय तिरंगी मालिकेच्या सामन्यादरम्यान असाच एक प्रसंग घडला. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज अझमतुल्ला उमरझाईने ब्रायन बेनेटला क्लीन बोल्ड केले, परंतु विकेट देण्याऐवजी पंचांनी तो चेंडू डेड बॉल घोषित केला. तो चेंडू नो-बॉल नव्हता, तरीही उमरझाईची विकेट नाकारण्यात आली.

यामागील कारण म्हणजे गोलंदाजाने खाली टाकलेला टॉवेल. ही घटना झिम्बाब्वेच्या डावातील आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. उमरझाई गोलंदाजी करण्यासाठी धावत येत असताना त्याच्या कमरेला गुंडाळलेला टॉवेल खाली पडला. त्यानंतर त्याने चेंडू फेकला. बेनेटने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटला लागून यष्टींवर आदळला. यष्टी पडताच अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी जल्लोष सुरू केला.

मात्र पडणाऱ्या टॉवेलमुळे आपले लक्ष विचलित झाल्याचे बेनेटने तात्काळ पंचांकडे तक्रार केली. त्यानंतर पंचांनी चर्चा करून चेंडू डेड घोषित केला. या निर्णयामुळे बेनेट नाबाद राहिला आणि उमरझाईला विकेट देण्यात आली नाही. मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) नियमांनुसार, जर एखाद्या घटनेमुळे फलंदाजाचे लक्ष विचलित झाले, तर पंच परिस्थितीनुसार चेंडू डेड घोषित करू शकतात. या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, कारण टॉवेल खाली पडत असूनही बेनेटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता.

यामुळे या परिस्थितीत हा निर्णय योग्य होता की नाही यावर चर्चा सुरू झाली. पंचांच्या निर्णयावर तज्ज्ञ समालोचकांची वेगवेगळी मते होती. एका समालोचकाच्या मते, शॉट खेळण्यापूर्वी बेनेटने बाजूला व्हायला हवे होते. फलंदाजाने आधी शॉट खेळला, तो बोल्ड झाला आणि नंतर टॉवेल पडल्याचा मुद्दा उपस्थित केला, यावर त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जीवदान मिळूनही बेनेटला त्याचा फायदा घेता आला नाही. तो ३१ धावांवर बाद झाला, त्यामुळे झिम्बाब्वेचा संघ १३६ धावांवर ऑलआऊट झाला. तत्पूर्वी सेदिकुल्ला अटलच्या १०२ आणि इब्राहिम झद्रानच्या ९० धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने २९४ धावा केल्या होत्या. रशीद खानने १७ धावांत ४ बळी घेतले. या प्रभावी कामगिरीमुळे अफगाणिस्तानने हा सामना १५८ धावांनी जिंकला.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!