BBL 2022: Alex Hales ने वेगवान बॉलवर पाय बाहेर काढून कसला लांबलचक SIX मारला, पहा VIDEO

BBL 2022: सोशल मीडियावर या जबरदस्त SIX चीच चर्चा आहे.

BBL 2022: Alex Hales ने वेगवान बॉलवर पाय बाहेर काढून कसला लांबलचक SIX मारला, पहा VIDEO
bbl
Image Credit source: fox
| Updated on: Dec 20, 2022 | 4:39 PM

BBL 2022: ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग टुर्नामेंट सुरु आहे. या लीगच्या 9 व्या मॅचमध्ये सिडनी थंडरकडून खेळताना एलेक्स हेल्सने तुफानी बॅटिंग केली. त्याने 50 चेंडूत 68 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. या इनिंग दरम्यान त्याने मारलेला एक सिक्स पाहून गोलंदाजही हैराण झाले. हेल्स 14 धावांवर खेळत होता. त्यावेळी त्याला गुड लेंथवर चेंडू मिळाला.

हा सिक्स पाहून हैराण

या चेंडूवर पुढे येऊन त्याने तुफानी सिक्स मारला. इनिंगमधील तिसऱ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर त्याने हा सिक्स मारला. प्रतिस्पर्धी टीमचे खेळाडू सुद्धा हा सिक्स पाहून हैराण झाले. शॉट खेळताना हेल्सने पॉवर बरोबर टायमिंगही दाखवला.

कोणामध्ये सामना?

बिग बॅश लीगमध्ये Adelaide Strikers vs Sydney Thunder मध्ये एडिलेड ग्राऊंडवर सामना सुरु आहे. या मॅचमध्ये सिडनी थंडरने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याने 5 विकेट गमावून 150 धावा केल्या. हेल्सने 68 धावा फटकावल्या. ओलीवर डेविसने 42 धावांच योगदान दिलं.


मॅच जिंकण्यासाठी 151 धावांची गरज

Adelaide Strikers कडून मागच्या सामन्यात 5 विकेट घेणाऱ्या हेनरी थॉर्नटनने 2 विकेट काढल्या. Colin de Grandhomme ने 2 विकेट काढल्या. Adelaide Strikers ला मॅच जिंकण्यासाठी 151 धावांची आवश्यकता आहे.