AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games 2026 : एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा, गोल्ड मेडल जिंकून देणाऱ्या ऋतुराजला संधी नाही

India squad for Asian Games 2026 : बीसीसीआय निवड समितीने एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाने गेल्या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात सुवर्ण पदक पटकावलं होतं.

Asian Games 2026 : एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा, गोल्ड मेडल जिंकून देणाऱ्या ऋतुराजला संधी नाही
Ruturaj Gaikwad Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 06, 2026 | 11:54 PM
Share

बीसीसीआय निवड समितीने 6 जून रोजी आगामी एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर तिलक वर्मा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. तसेच निवड समितीने भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या स्पर्धेसाठी संधी दिली आहे. सोबतच 15 वर्षांचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचीही निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

जसप्रीत बुमराहचा समावेश

बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी जसप्रीत बुमराहचा समावेश केलेला नाही. मात्र बुमराहला एशियन गेम्ससाठी बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बुमराह आता थेट एशियन गेम्स स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे बुमराह या महत्त्वाच्या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ऋतुराज गायकवाडला डच्चू

टीम इंडिया या स्पर्धेतील गतविजेता आहे. ऋतुराज गायकवाड याने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला 2023 साली विजयी केलं होतं. टीम इंडियाने तेव्हा अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्यामुळे टीम इंडियासमोर यंदा सुवर्ण पदक कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे.

एशियन गेम्स स्पर्धा आणि टीम इंडियाचे खेळाडू

स्पर्धेला केव्हापासून सुरुवात?

दरम्यान एशियन गेम्स स्पर्धेचं 17 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या 10 संघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, जपान, मलेशिया, हाँगकाँग आणि ओमानचा समावेश आहे.

एशियन गेम्ससाठी टीम इंडिया : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह.

2 मल्टी डे मॅचसाठी संघ जाहीर

तसेच बीसीसीआयने श्रीलंका ए विरुद्धच्या 2 मल्डी डे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार ध्रुव जुरेल हा इंडिया ए टीमचं नेतृत्व करणार आहे. देवदत्त पडीक्कल उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ...

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक