सौरव गांगुलीची इनिंग संपली, महिला IPL ची घोषणा, जाणून घ्या BCCI AGM मधल्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल

| Updated on: Oct 18, 2022 | 6:26 PM

महिला IPL चे सामने कधी होणार? किती टीम्स असतील. सर्व डिटेल्स जाणून घ्या....

सौरव गांगुलीची इनिंग संपली, महिला IPL ची घोषणा, जाणून घ्या BCCI AGM मधल्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल
Sourav Ganguly
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: बीसीसीआयची (BCCI) 91 वी वार्षिक सभा मंगळवारी झाली. सौरव गांगुली यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ आज संपला. रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष झाले आहेत. बीसीसीआयच्या एजीएममध्ये (AGM) अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांशिवाय या बैठकीत पुरुष आणि महिलांच्या फ्यूचर टूर प्रोग्रॅम आणि महिला आयपीएलबद्दल (Womens IPL) मोठी घोषणा करण्यात आली. रॉजर बिन्नी यांच्याहातात आता बीसीसीआयचा कारभार आहे. 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे ते सदस्य आहेत. सर्वच पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली.

    • राजीव शुक्ला उपाध्यक्ष, जय शाह सचिव, देवाजीत सायकिया संयुक्त सचिव आणि आशिष शेलार खजिनदार झाले आहेत.
    • एजीएममध्ये बीसीसीआयच्या अपेक्स काऊन्सिलच्या प्रतिनिधीची निवड करण्यात आली. एमकेजे मजूमदार यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.
    • बीसीसीआयच्या एजीएममध्ये अरुण धुमल आणि अविषेक डालमिया यांची आयपीएल प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. धूमल आयपीएलचे नवीन चेयरमन बनू शकतात.
  • एजीएममध्ये जनरल बॉडीने ऑडिट अकाऊंट 2021- 2022 ला मंजुरी दिली आहे.
  • मीटिंगमध्ये 2022- 2023 च्या वार्षिक बजेटला मंजुरी देण्यात आली आहे.
  • जनरल बॉडीने एजीएममध्ये सीनियर पुरुष टीमच्या 2023 ते 2027 आणि वुमेन्स टीमच्या 2022 ते 2025 पर्यंतच्या फ्यूचर टूर प्रोग्रॅमला मंजुरी देण्यात आली.
  • मुंबईत झालेल्या या बैठकीत महिला आयपीएलला मंजुरी देण्यात आली. पुढच्यावर्षी मार्चमध्ये ही आयपीएल होईल. महिला आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये 5 टीम्स असतील. पुरुष आयपीएलच्या आधी महिला आयपीएल होईल. महिला आयपीएलमध्ये 20 लीग सामने खेळले जातील. सर्वच टीम्स परस्पराविरुद्ध दोन सामने खेळतील.