AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCL 2026: बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला मोठ्या दिमाखात सुरूवात, क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसाद

बिग क्रिकेट लीग स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. पहिल्या पर्वात या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यंदाही या पर्वासाठी क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह आहे. इतकंच काय तर क्रिकेटपटूंसाठी मोठं व्यासपीठ आहे.

BCL 2026: बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला मोठ्या दिमाखात सुरूवात, क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसाद
BCL 2026: बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला मोठ्या दिमाखात सुरूवात, क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसादImage Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 04, 2026 | 3:35 PM
Share

बिग क्रिकेट लीग अर्थात बीसीएलच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात झाली आहे. ग्रेटर नोएडाच्या प्रसिद्ध शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या लीगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त मोठ्या स्टार्ससाठीची लीग नाही, तर सामान्य क्रिकेटपटूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधीही देते. जे खेळाडू अनेक वर्षे क्रिकेट खेळले आहेत पण मोठ्या व्यासपीठावर पोहोचले नाहीत, त्यांच्यासाठी बिग क्रिकेट लीग एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लीगमध्ये एकूण सहा संघ सहभागी झाले असून, स्पर्धा अत्यंत चुरशीची आहे. बिग क्रिकेट लीग ही आता केवळ एक स्पर्धा राहिलेली नाही, तर तरुण भारताच्या स्वप्नांचे आणि जिद्दीचे प्रतीक बनली आहे.

या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यासाठी स्टेडियम खचाखच भरलं होतं. रंगीबेरंगी झेंडे, रोषणाई, स्टेजची सजावट आणि उत्साह संपूर्ण स्टेडियममध्ये पसरला होता. ढोलांचा दणदणाट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नेत्रदीपक आतषबाजीने लीगची सुरुवात दिमाखदार झाली. ही स्पर्धा पाहताना आयपीएलसारखा उत्साह निर्माण झाला होता. यूपी ब्रिज स्टार्स आणि मुंबई मरीनचे संघ मैदानात उतरले होते. तेव्हा प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि त्याचं स्वागत केलं. या संघांमध्ये शिखर धवन, श्रीशांत आणि रॉस टेलर यांसारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गजांचा समावेश होता. गॅलरीतील प्रेक्षक या स्टार खेळाडूंना जवळून पाहून रोमांचित झाले होते.

बीसीएल लीगच्या सामन्याचे उद्घाटन उत्तर प्रदेश सरकारचे लोकप्रिय नेते ठाकूर रघुराज सिंह यांच्या हस्ते झाले. सरकामध्ये ते कामगार आणि रोजगार राज्यमंत्री तसेच क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री आहेत. त्यांनी स्वतः सर्व खेळाडूंची भेट घेतली, त्यांना प्रोत्साहन दिले आणि औपचारिकपणे सामन्याचे उद्घाटन केले. त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं की, “सरकार तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बिग क्रिकेट लीग ही केवळ एक क्रिकेट स्पर्धा नाही, तर ती एक संपूर्ण परिसंस्था तयार करत आहे. ती तरुणांना क्रीडा तसेच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत आहे.”

अधिकृत मीडिया पार्टनर म्हणून टीव्ही9 च्या सहभागामुळे लीगला आणखी बळकटी मिळाली आहे. या स्पर्धेला भारतातच नव्हे, तर परदेशातही दमदार कव्हरेज मिळाले आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण, हायलाइट्स, खेळाडूंच्या मुलाखती आणि विशेष अहवाल प्रेक्षकांना घरबसल्या संपूर्ण आनंद देत आहेत.

बिग क्रिकेट लीग विशेष का आहे?

  • सामान्य खेळाडूंसाठी एक मोठे व्यासपीठ
  • युवकांच्या स्वप्नांना पंख देणे
  • क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे
  • रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे
  • छोट्या शहरांमधील प्रतिभेला ओळख देणे

BCL_League

पहिल्या पर्वातील विजेते मुंबई मरीन्स आणि यजमान संघ यूपी ब्रिज स्टार्स यांच्यातील उद्घाटन सामना रोमांचक ठरला. मुंबई मरीन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 171 धावा केल्या. तर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील यूपी ब्रिज स्टार्सने उत्कृष्ट फलंदाजी करत काही चेंडू शिल्लक असतानाच 172 धावांचे लक्ष्य गाठले. सामन्याचा थरार शेवटच्या षटकांपर्यंत कायम होता. आता सर्वांच्या नजरा आगामी सामन्यांवर आहेत. यूपी ब्रिज स्टार्स आपली विजयी घोडदौड कायम ठेवू शकतील का? की मुंबई मरीन आणि इतर संघ पुनरागमन करतील? याकडे लक्ष असेल.

Follow Us
20 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक रुग्णालयात; जंतरमंतरवर मोठा गोंधळ
Delhi | 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक रुग्णालयात; मात्र जंतरमंतरवर मोठा गोंधळ
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा.

Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवंल – संजय राऊत कडाडले.

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवंल – संजय राऊत कडाडले

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले.

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले

आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाला काय ॲाफर? पडद्यामागे काय घडतंय?.

आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाला काय ॲाफर? पडद्यामागे काय घडतंय?

मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ.

मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ

NCP Merger Talk : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही भाजपची इच्छा, पण पवार कुटुंबातील दोन व्यक्तींचा विरोध.

NCP Merger Talk : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही भाजपची इच्छा, पण पवार कुटुंबातील दोन व्यक्तींचा विरोध