PHOTO : चेन्नई सुपरकिंग्सचा संघ उर्वरीत IPL मध्ये सर्वात घातक?, ‘या’ पाच खेळाडूंनी स्पर्धेआधीच दाखवला जलवा

| Updated on: Sep 12, 2021 | 11:50 AM

आयपीएल 2021 च्या उर्वरीत सामन्यांना 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यावेळी पहिलाच सामना मातब्बर चेन्नई सुपरकिंगर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात असणार आहे.

1 / 5
चेन्नई सुपर किंग्स संघासाठी 2020 चा सीजन चांगला गेला नाही. पण 2021 च्या सीजनमधील आतापर्यंत झालेल्या सामन्यात चेन्नईने अप्रतिम प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे उर्वरीत आयपीएलच्या सामन्यांतही तसंच प्रदर्शन करुन स्पर्धा जिंकण्यासाठी खेळाडू सज्ज झाले आहेत. दरम्यान संघातील काही खेळाडूंनी स्पर्धेपूर्वीच आपला जलवा दाखवायला सुरुवात केली आहे.

2 / 5
या खेळाडूंमध्ये एक नाव म्हणजे फाफ डु प्लेसी (Faf Duple si). फाफने आतापर्यंत झालेल्या आय़पीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. तर सध्या सुरु असलेल्या सीपीएलमध्येही फाफची बॅट अक्षरश: आग ओकत आहे. सेंट लूसिया संघाकडून खेळणाऱ्या फाफने एका सामन्यात तर 54 चेंडूत 84 धावांची तुफान खेळी केली. यात त्याने चार चौकार आणि चार षटकार लगावले. त्याआधीच्या एका सामन्यात त्याने 120 धावा करत शतक ठोकलं होतं.

3 / 5
यानंतर चेन्नईच्या या खेळाडूला तर आता सारं जग ओळखू लागलं आहे. इंग्लंड दौऱ्यात अप्रतिम अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या शार्दूल ठाकुरने (Shardul Thakur) त्याच्या कामगिरीने सर्वांचीच मनं जिंकली असून त्याच्या अष्टपैलू खेळीचा चेन्नईला फायदा होणार हे नक्की, इंग्लंड दौऱ्यात दोन कसोटी सामन्यात त्याने तीन डावांत  39.00 च्या सरासरीने 117 धावा करत 14 चौकार आणि 4 षटकार लगावले.

4 / 5
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू इम्रान ताहिर (Imran Tahir) यानेही CPL 2021 मध्ये अप्रतिम कामगिरी सुरुच ठेवली आहे. त्याने 9 सामन्यात  11 विकेट्स घेतल्या आहेत. नुकत्याच एका सामन्यात ताहिरने चार ओव्हरमध्ये केवळ 12 रन्स देत दोन विकेट्स घेतले.

5 / 5
चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो अर्थात डीजे ब्राव्होबी CPL 2021 मध्ये कमालीची कामगिरी करत आहे. त्याने 7 सामन्यात 39.00 च्या सरासरीने 78 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीतही तो दमदार प्रदर्शन करत असून नुकत्याच एका सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये 26 रन देत 4 विकेट्स घेतल्या.