पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल, T20 World Cup पूर्वीच वकार आणि मिस्बाह यांचा प्रशिक्षक पदाचा राजीनामा

| Updated on: Sep 06, 2021 | 3:43 PM

एकीकडे पाकिस्तानने टी-20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे त्याचे मुख्य प्रशिक्षकच संघ सोडून गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट समोर प्रशिक्षक नेमण्याचं आव्हान येऊन ठेपलं आहे.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल, T20 World Cup पूर्वीच वकार आणि मिस्बाह यांचा प्रशिक्षक पदाचा राजीनामा
वकार यूनुस आणि मिस्बाह उल हक
Follow us on

कराची : पाकिस्तान क्रिकेटने (Pakistan Cricket) नुकतंच आगामी  टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup)त्यांच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पण एकीकडे संघ निवड केली असता दुसरीकडे संघ व्यवस्थापनासमोर आता मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक शोधण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. पाकिस्तानने विश्व चषकासाठी संघ निवड करताच काही तासांत संघाचा मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक (misbah ul haq) आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार यूनुस (waqar younis) यांनी राजीनामा दिला आहे. स्वत: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) याबद्दल माहिती दिली आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक मिस्बाह आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार यांची नियुक्ती 2019 मध्ये करण्यात आली होती. करारानुसार या दोघांचाही अजून एक वर्षांचा कार्यकाळ शिल्लक होता. पण त्यापूर्वीच दोघांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी या दोघांची जागा सक्लैन मुश्ताक आणि अब्दुल रझाक यांना देण्यात आली आहे.

पाकिस्तानकडून कसोटी संघची घोषणा

पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) नुकतीच त्यांच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की, 15 सदस्यांमध्ये केवळ 5 विश्वासू फलंदाजाना स्थान देण्यात आलं आहेय. त्यांच्याशिवाय 2 यष्टीरक्षक, 4 ऑलराउंड अष्टपैलू आणि 4 वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. तर 3 खेळाडू राखीव म्हणून संघासोबत असतील. हा संघ विश्वचषकाआधी न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) यांच्याविरुद्ध सामने खेळणार आहे. पाकिस्तान संघ लाहोर आणि रावळपिंडी या घरच्या मैदानात 7 टी-20 सामने खेळणार आहे. 25 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान हे सामने होतील.

T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा 15 सदस्यीय संघ :

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, आजम खान, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद, शाहीन आफ्रीदी

राखीव खेळाडू : फखर जमान, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी

संबंधित बातम्या 

T20 World Cup Ind vs Pak : टी 20 च्या मैदानात सर्वात मोठा सामना, भारत वि पाकिस्तान मॅचचं टाईम टेबल जाहीर

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

(Before T 20 world cup misbah ul haq and waqar younis step down as pakistan cricket Team coach)