AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs SRH Live Streaming : चेन्नईसमोर हैदराबादचं आव्हान, ऑरेंज आर्मी प्लेऑफचं तिकीट मिळवणार?

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live Scorecard: चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद 18 मे रोजी 19 व्या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. चेन्नईकडे या सामन्यात ऑरेंज आर्मीचा हिशोब करण्याची संधी आहे.

CSK vs SRH Live Streaming : चेन्नईसमोर हैदराबादचं आव्हान, ऑरेंज आर्मी प्लेऑफचं तिकीट मिळवणार?
CSK vs SRH IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 17, 2026 | 11:31 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) सोमवारी 18 मे रोजी 63 व्या सामन्यात 2 चॅम्पियन संघ आमनेसामने असणार आहे. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील 13 वा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांनी आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. चेन्नईच्या तुलनेत हैदराबादची स्थिती चांगली आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना कधी?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सोमवारी 18 मे रोजी होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना कुठे?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना एमए चिदंबरम स्टेडिमय, चेन्नई इथे होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल-लॅपटॉपवर पाहता येईल.

चेन्नई हैदराबादचा हिशोब करणार?

हैदराबादने 12 पैकी 7 सामने जिंकलेत. हैदराबादच्या खात्यात 14 गुण आहेत. तर चेन्नईने 12 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांची कमाई केलीय. त्यामुळे हैदराबादचा आणखी 2 गुण मिळवून प्लेऑफमधील प्रवेश आणखी सुरक्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचा हैदराबादला पराभूत करुन हिशोब करुन आपलं आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.

याआधी दोन्ही संघांत 18 एप्रिल रोजी आमनासामना झाला होता. तेव्हा हैदराबादने चेन्नईवर 10 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे यलो आर्मी ऑरेंज आर्मीचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान उभयसंघात आतापर्यंत एकूण 23 सामने खेळवण्यात आले आहेत. चेन्नईने 23 पैकी सर्वाधिक 15 सामने जिंकले आहेत. तर हैदराबाद 8 सामने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.

Follow Us
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा