T20 Captain | ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूला बनवलं T20 कॅप्टन

T20 Captain | ऑस्ट्रेलियाने T20 वर्ल्ड कपआधी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियाने मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप खेळला होता.

T20 Captain | ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, या खेळाडूला बनवलं T20 कॅप्टन
Cricket Australia
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 07, 2023 | 11:46 AM

सिडनी : ऑस्ट्रेलियान T20 क्रिकेटच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने T20 मध्ये नव्या कर्णधाराची नियुक्ती केली आहे. T20 वर्ल्ड कपला वर्षभरापेक्षा कमी कालावधी राहिलेला असताना, हा निर्णय घेतला आहे. T20 वर्ल्ड कप विचारात घेऊन, ऑस्ट्रेलियन टीमने तयारीच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलय. ऑस्ट्रेलियाने T20 च्या कर्णधारपदी मिचेल मार्शची निवड केली आहे. तो मॅथ्यू वेडची जागा घेईल.

ऑस्ट्रेलियाने मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप खेळला होता. मिचेल मार्श त्या टीमचा भाग होता. कर्णधार बनण्याआधी मार्शने शेवटच्या सामन्यात 30 चेंडूत 45 धावा फटकावल्या होत्या. आता मिचेल मार्श फक्त टीमचा भाग नसेल, त्याचा कॅप्टनचा रोल असेल.

ऑस्ट्रेलियन कॅप्टनच T20 मधील करिअर

ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर मिचेल मार्श आतापर्यंत 46 T20 सामने खेळलाय. त्यात त्याने 15 विकेट घेताना 1086 धावा केल्या आहेत. त्याने 6 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये 24 धावात 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

वनडेमध्येही तोच कॅप्टन दिसू शकतो

मिचेल मार्श दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून टीमची कमान संभाळणार आहे. 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियन टीम 5 वनडे आणि 3 T20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. फॉक्स क्रिकेटने न्यूज कॉर्पचा हवाला देऊन मिचेल मार्शला T20 चा कॅप्टन बनवल्याच जाहीर केलं. T20 फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियाच नेतृत्व करणारा तो 12 वा खेळाडू आहे. पॅट कमिन्सला दुखापत झालीय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापर्यत त्याची दुखापत बरी झाली नाही, तर मिचेल मार्शच वनडेमध्ये नेतृत्व करताना दिसेल.

कधीपर्यंत होणार वनडे टीमची निवड?

ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 3 T20 सामने डरबनमध्ये खेळणार आहे. हे सामने 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान खेळले जाणार आहेत. त्यानंतर वनडे सीरीज होईल. 28 सप्टेंबरच्या आधी वनडे वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन टीमची निवड होऊ शकते.