AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs SRH : सनरायझर्स हैदराबादची चिवट बॉलिंग, चेन्नईच्या 180 धावा, कोण जिंकणार?

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad, IPL 2026 : सनरायझर्स हैदराबाद टीमला विजयासह प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर चेन्नई विरुद्ध प्रत्येक ओव्हरमध्ये 9.05 या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.

CSK vs SRH : सनरायझर्स हैदराबादची चिवट बॉलिंग, चेन्नईच्या 180 धावा, कोण जिंकणार?
Pat Cummins CSK vs SRHImage Credit source: Bcci
| Updated on: May 18, 2026 | 10:40 PM
Share

सनरायझर्स हैदराबाद टीमच्या गोलंदाजांनी आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026) 63 व्या आणि निर्णायक सामन्यात चिवट बॉलिंग करत होम टीम चेन्नई सुपर किंग्सला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. चेन्नईने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये हैदराबादसमोर विजयासाठी 181 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. त्यामुळे आता चेन्नई सामना जिंकून आव्हान कायम राखणार की हैदराबाद सामना जिंकून आपल्यासह गुजरात टायटन्सला प्लेऑफचं तिकीट मिळवून देणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. त्यामुळे या सामन्यातील शेवटच्या 20 ओव्हरकडे लक्ष असणार आहे.

चेन्नईची बॅटिंग

चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. चेन्नईसाठी एकूण 8 फलंदाजांनी बॅटिंग केली. त्यापैकी पहिल्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठला. मात्र या 7 पैकी एकालाही चेन्नईसाठी अर्धशतक करता आलं नाही. तर अकील हौसेन याने नाबाद 3 धावा केल्या. हैदराबादच्या गोलंदाजांनी केलेल्या चिवट गोलंदाजीमुळे चेन्नईला फटकेबाजी करता आली नाही.

चेन्नईने पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 57 धावा केल्या. त्यानंतर चेन्नईला 7 ते 16 या 10 ओव्हरमध्ये गिअर बदलता आला नाही. चेन्नईने 7 ते 16 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 87 धावा जोडल्या. तसेच हैदराबादने शेवटच्या 3 ओव्हरमध्ये अप्रतिम बॉलिंग केली. डावातील शेवटच्या 3 ओव्हर निर्णायक असतात. हैदराबादने याच 3 षटकांत धावांवर ब्रेक लगावला. चेन्नईला या 18 बॉलमध्ये 3 विकेट्स गमावून 36 रन्सच करता आल्या.

चेन्नईसाठी सर्वाधिक धावा कुणाकडून?

दरम्यान चेन्नईसाठी डेवाल्ड ब्रेव्हीस याने सर्वाधिक धावा केल्या. डेवाल्डने 27 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. कार्तिक शर्मा याने 32 धावांचं योगदान दिलं. शिवम दुबे याने 26 आणि संजू सॅमसन याने 27 धावा केल्या. प्रशांत वीर याने 11, उर्विल पटेल 13 आणि ऋतुराज गायकवाड याने 15 धावा केल्या. तर अकील हौसेन याने नाबाद 3 धावा केल्या. हैदराबादसाठी कॅप्टन पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. साकीब हुसैन याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर प्रफुल हिंगे आणि एशान मलिंगा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

स्कोअरकार्ड

चेन्नई आणि हैदराबादची कामगिरी

दरम्यान चेन्नईने या हंगामात 12 पैकी 6 सामने जिंकलेत. तर चेन्नईला 6 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. तर हैदराबादने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादला 5 सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाकडून पराभूत व्हावं लागलं आहे.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने