AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: आयपीएलमधील ‘या’ धुरंदर खेळाडूचा विलगीकरणातही सराव, हॉटेल रुममध्येच सुरु केली बॅटिंगची प्रॅक्टीस

आयपीएलच्या उर्वरीत पर्वाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या पर्वासाठी सर्व खेळाडू सध्या सराव करण्यात व्यस्त असून एका धाकड फलंदाजाने तर थेट हॉटेल रुममध्येच सराव करण्यास सुरुवात केली आहे.

VIDEO: आयपीएलमधील 'या' धुरंदर खेळाडूचा विलगीकरणातही सराव, हॉटेल रुममध्येच सुरु केली बॅटिंगची प्रॅक्टीस
डेव्हीड वॉर्नर
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 10:09 AM
Share

दुबई: आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. सर्व संघ आपल्या खेळाडूंसह या भव्य स्पर्धेच्या दुसऱ्या भागासाठी तयार झाले आहेत. यावेळी अनेक संघात काही महत्त्वाचे बदल देखील झाले आहेत. दरम्यान कोरोनाचं संकट अजूनही कायम असल्यामुळे कोरोनासंबधी सर्व नियम पाळले जात आहेत. त्यामुळे युएईत नव्याने पोहोचणारे संघ आणि खेळाडू विलगीकरणाचे नियम पाळूनच सरावाला सुरुवात करत आहेत. अशावेळी विलगीकरणातही एका खेळाडूला सराव केल्याशिवाय चैन पडेना… त्यामुळे त्याने थेट हॉटेल रुममध्येच फलंदाजीची प्रॅक्टीस सुरु केली आहे.

हा खेळाडू म्हणजे सनराजर्स हैद्राबाद संघातून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner). वॉर्नर हा कायमच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. टिकटॉकवर तर त्याने इंडियन गाण्यांवर अक्षरश: धुम उडवली होती. संपूर्ण कुटुंबासह वॉर्नर टीक-टॉक बनवत असतो. आता यावेळी मात्र त्याने गाण्यांवर व्हिडीओ बनवला नसून त्याने हॉटेल रुममध्ये फलंदाजीचा सराव करताना व्हि़डीओ केला आहे. हा व्हिडीओ सनराजर्स हैद्राबादने त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी ‘विलगीकरण असो वा नसो सराव गरजेचाच आहे.’ असं कॅप्शनही दिलं आहे.

हैद्राबाद संघाची परिस्थिती सर्वात खराब

संजू सॅमसन कर्णधार असलेली राजस्‍थान रॉयल्‍स (Rajasthan Royals) यंदा 7 पैकी 3 सामने जिंकली आहे.  तर पंजाब किंग्‍स (Punjab Kings) 8 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवू शकली आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) केवळ दोनच सामने जिंकली आहे. पण या सर्वात सर्वात खराब परिस्थिती हैद्राबाद संघाची असून त्यांनी सात पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे.

हे ही वाचा-

IPL 2021 च्या पहिल्या पर्वात कोणी जिंकले किती सामने? पाहा एका क्लिकवर

विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?

IPL 2021: सलामीला येत ‘हे’ धुरंदर उधळतात जलवा, पाहा कोण आहेत हे दिग्गज!

(David Warner practising in hotel room before IPL 2021 starts)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.