IPL 2021: सलामीला येत ‘हे’ धुरंदर उधळतात जलवा, पाहा कोण आहेत हे दिग्गज!

आयपीएल 2021 च्या उर्वरीत पर्वाला 19 सप्टेंबरला पुन्हा सुरुवात होत आहे. पहिल्या पर्वातील बऱ्यापैकी सर्वच सामने उत्कंठावर्धक झाले. आता उर्वरीत सामनेही चुरशीचे होणार हे नक्की.

1/6
आयपीएलला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे.

2/6
सलामीवीर म्हणून सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून आयपीएलच्या इतिहासात    भारतीय दिग्गज शिखर धवनचं नाव सर्वात वर आहे. दिल्ली, हैद्राबाद अशा संघाकडून खेळताना धवनने 5 हजार 577 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने सलामीला येत 5 हजार 170 धावा ठोकल्या आहेत. ज्यात दोन शतकं आहेत.

3/6
दुसऱ्या नंबरवर ऑस्ट्रेलियाचा धाकड सलामीवीर डेविड वॉ़र्नरचं नाव आहे. त्याने दिल्ली संघाकडून खेळण्यास सुरुवात केली होती. सध्या तो हैद्राबाद संघाकडून IPL गाजवत आहे. त्याने 5 हजार 447 धावा केल्या असून यातील 4 हजार 792 धावा त्याने सलामीला येत केल्या आहेत.

4/6
तिसऱ्या नंबरला युनिव्हर्सल बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलचा नंबर लागतो. अनेक धमाकेदार खेळी करणाऱ्या गेलने IPL मध्ये 4 हजार 950 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने 6 शतकं ठोकली आहेत. त्याने  4 हजार 480 धावा सलामीला येत केल्या आहेत.

5/6
या यादीच चौथं स्थान आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचं. कोलकाता नाइट रायडर्सला दोनदा आयपीएलचा खिताब जिंकवून देणाऱ्या गंभीरने आयपीएलमध्ये 4 हजार 217 धावा केल्या आहेत.  यातील 3 हजार 597 धावा त्याने सलामीला येत केल्या आहेत.

6/6
पाचव्या स्थानावर आहे अजिंक्य रहाणे. भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने  दिल्लीकडून खेळण्यास सुरुवात केली होती. आता तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. त्याने पुणे सुपरजायंट्स संघातही फलंदाजी केली आहे, त्याने आतापर्यंत 3 हजार 941 धावा केल्या असून यात 2 शतकं सामिल आहेत. ज्यातील 3 हजार 462 धावा त्याने सलामीला येत केल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI