AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 च्या पहिल्या पर्वात कोणी जिंकले किती सामने? पाहा एका क्लिकवर

बहुचर्चित इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL काही दिवसांत सुरु होणार आहे. पहिल्या पर्वात काही अप्रतिम सामने आपण पाहिले. आता दुसऱ्या पर्वातही अशाच सामन्यांची अपेक्षा क्रिकेटप्रेमी करत आहेत.

IPL 2021 च्या पहिल्या पर्वात कोणी जिंकले किती सामने? पाहा एका क्लिकवर
आयपीएल
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 6:46 PM
Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) यंदाचे 14 वे पर्व कोरोनाच्या संकटामुळे मध्येच थांबवण्यात आले होते. आता आय़पीएलला (IPL-2021)  युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तर दुसऱ्या पर्वाला सुरुवात होण्याआधी पहिल्या पर्वात कोणत्या संघाचा दबदबा अधिक होता? आणि कोणता संघ कामगिरी करण्यात अयशस्वी राहिला यावर एक नजर फिरवूया…

तर पहिल्या पर्वात दिल्‍ली कॅपिटल्‍स आणि पंजाब किंग्‍सने 8-8 सामने खेळले असून इतर संघानी 7-7 सामने खेळले आहेत. यामध्ये दिल्‍ली कॅपिटल्‍सचा (Delhi Capitals) संघ सर्वात यशस्वी असून त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यानंतर चेन्‍नई सुपरकिंग्‍सला (Chennai Superkings) महेंद्र सिंह धोनीने 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत.

कोहलीच्या आरसीबीसाठी यंदाची आयपीएल उत्तम

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत एकही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचा संघ रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) उत्तम प्रदर्शन करत आहे. त्यांनी उत्तम सुरुवात करत 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्याशिवाय भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदा 7 पैकी 4 सामने जिंकली आहे.

हैद्राबाद संघाची परिस्थिती सर्वात खराब

संजू सॅमसन कर्णधार असलेली राजस्‍थान रॉयल्‍स (Rajasthan Royals) यंदा 7 पैकी 3 सामने जिंकली आहे.  तर पंजाब किंग्‍स (Punjab Kings) 8 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवू शकली आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) केवळ दोनच सामने जिंकली आहे. पण या सर्वात सर्वात खराब परिस्थिती हैद्राबाद संघाची असून त्यांनी सात पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे.

हे ही वाचा-

विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?

IPL 2021: सलामीला येत ‘हे’ धुरंदर उधळतात जलवा, पाहा कोण आहेत हे दिग्गज!

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

(In IPL 2021 till now which team won how many matches know on one click)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.