DC vs KKR Head to Head, IPL 2021 Qualifier 2 : दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यात कोणाचं पारडं जड, जाणून घ्या आकड्यांचा खेळ

| Updated on: Oct 13, 2021 | 12:50 PM

आयपीएल 2021 मध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. शारजाह येथे होणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमनेसामने आहेत.

1 / 5
आयपीएल 2021 मध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. शारजाह येथे होणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमनेसामने आहेत. जो संघ आज हा सामना जिंकेल तो आयपीएल 2021 चा दुसरा फायनलिस्ट बनेल. दरम्यान, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघांपैकी कोणाचं पारडं जड आहे, तर कोणता संघ पाण्यात आहे.

2 / 5
आयपीएलच्या पिचवर दोन्ही संघांमध्ये आज 30 वा सामना होईल. यापूर्वी झालेल्या 29 सामन्यांपैकी 15 सामन्यांमध्ये कोलकात्याने बाजी मारली आहे, तर 13 सामने दिल्लीने जिंकले आहेत. 1 सामना अनिर्णीत राहिला होता.

3 / 5
या मोसमात शारजाहमध्ये कोलकाता आणि दिल्ली यांच्यातील ही दुसरी लढत असेल. येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव केला होता, ज्यामध्ये सुनील नारायणला सामनावीर ठरवण्यात आले. शारजाहमध्येच, केकेआरने आरसीबीविरुद्ध एलिमिनेटर सामना देखील जिंकला आहे आणि त्यातही नारायण केकेआरच्या विजयाचा नायक बनला होता. त्यामुळे हे स्पष्ट आहे की दिल्लीविरुद्धच्या सामन्यातदेखील सुनील नारायणच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

4 / 5
कोलकाता आणि दिल्ली या दोन संघांमध्ये झालेल्या शेवटच्या 5 सामन्यांवर नजर टाकली तर केकेआरवर दिल्लीचा 3-2 ने वरचष्मा आहे. त्याचबरोबर शेवटच्या दोन सामन्यांपैकी एक सामना दिल्लीने तर एक सामना कोलकात्याने जिंकला आहे.

5 / 5
केकेआरने या मोसमात शारजाहमध्ये 3 सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामने त्यांनी दिल्ली आणि RCB विरुद्ध खेळले आहेत, आणि या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांच्या गोलंदाजांनी एकही षटकार खाल्ला नाही. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएल 2021 मध्ये सर्वात कमी 60 षटकार ठोकणारा संघ आहे.