4 बॉल टाकले त्यात 65 Wide आणि 15 No Ball, गोलंदाजाचा प्रताप

| Updated on: Jan 06, 2023 | 7:08 PM

एका बॉलरने चक्क कहर केलाय कहर. या बॉलरने एकाच ओव्हरमध्ये एक्स्ट्रा बॉलमध्ये सर्वाधिक रन्स देण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय.

4 बॉल टाकले त्यात 65 Wide आणि 15 No Ball, गोलंदाजाचा प्रताप
Follow us on

Cricket News : श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात अर्शदीप सिंहने नो बॉलची हॅट्रिक केली. त्यामुळे अर्शदीपवर जोरदार टीका होतेय. अर्शदीप नो बॉल हॅट्रिक टाकणारा पहिलाच बॉलर ठरला. त्यामुळे अर्शदीपवर जोरदार टीका होतेय. मात्र एका बॉलरने चक्क कहर केलाय कहर. या बॉलरने एकाच ओव्हरमध्ये एक्स्ट्रा बॉलमध्ये सर्वाधिक रन्स देण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. बांगलादेशच्या बॉलरने हा कारनामा केलाय. (dhaka 2 division cricket league shiyom vs lalmatiya team bowler sujon mahmud give 92 runs in 4 balls no and wide ball extra runs)

ढाका सेंकंड डिव्हीजन क्रिकेट लीग स्पर्धेत शियोम विरुद्ध लालामटिया यांच्या सामना खेळवण्यात आला. या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजाने फक्त 4 बॉल टाकले, मात्र त्याने यातही जोरदार माती खाल्ली. या बॉलरने 65 वाईड आणि 15 नो बॉल टाकले. या सर्व प्रकाराचा तपास करण्यात आला. त्यानंतर 4 बॉलमध्ये फलंदाजाने 12 रन्स केल्या.

गोलंदाजाकडून अंपायरचा विरोध

लालमाटिया टीमचा बॉलर सुजोन महमूदने जाणीवपूर्वक 65 वाईड आणि 15 नो बॉल टाकले. महमूद अंपायरच्या चुकीचा विरोध करत होता. याआधी हा असा महान रेकॉर्ड न्यूझीलंडचा क्रिकेटर बर्टच्या नावावर होता. बर्टने वेलिंग्टनकडून खेळताना केंटरबॅरी विरुद्ध 22 बॉलमध्ये 77 धावा दिल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद सामीच्या नावावर आहे. सामीने मेडन ओव्हरने सुरुवात केली. समीने त्यानंतर एकाच ओव्हरमध्ये तब्बल 17 बॉल टाकले. यामध्ये 7 वाईड आणि 4 नो बॉल होते. सामीने बांगलादेश विरुद्ध एकाच ओव्हरमध्ये 22 धावा दिल्या होत्या.

भुवनेश्वर कुमारचा अनोखा विक्रम

अर्शदीपने सलग 3 नो बॉल टाकल्याने त्याच्यावर टीका होतेय. मात्र दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या भुवनेश्वर कुमारच्या नावावर अनोखा विक्रम आहे. भुवीने आतापर्यंत त्याच्या टी 20 करिअरमध्ये एकदाही नो बॉल टाकलेला नाही. भुवीने आतापर्यंत 298.3 ओव्हर टाकल्या आहेत. या दरम्यान त्याने एकदाही लाईन क्रॉस केलेली नाही.