Duleep Trophy | 9 व्या नंबरवर येऊन ठोकली सेंच्युरी, 6,6,6,6,6,6,6,6,6, कोण आहे Harshit Rana?

Duleep Trophy | आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून डेब्यु केला होता. राणाने आपल्या गोलंदाजीचा वेग आणि बाऊन्सने फलंदाजांना हैराण केलं होतं. मैदानात Four-Six चा पाऊस पाडला.

Duleep Trophy | 9 व्या नंबरवर येऊन ठोकली सेंच्युरी, 6,6,6,6,6,6,6,6,6, कोण आहे Harshit Rana?
harshit-rana
Image Credit source: instagram
| Updated on: Jun 30, 2023 | 8:03 AM

नवी दिल्ली : टीम इंडिया सध्या मैदानापासून लांब आहे. पण भारतीय क्रिकेटमध्ये Action सुरु झालीय. देशांतर्गत क्रिकेटमधील पहिली टुर्नामेंट दुलीप ट्रॉफी सुरु झालीय. वेगवेगळ्या झोन्समध्ये होणाऱ्या या टुर्नामेंटमध्ये अनेक क्रिकेटर्स आपली ताकत दाखवून देतायत. टुर्नामेंटच्या दुसऱ्या दिवशी एका क्रिकेटरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हर्षित राणा हा प्लेयरट नॉर्थ झोनकडून खेळतोय. त्याने नवव्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरुन थेट 75 चेंडूत शतक ठोकलं. मूळात म्हणजे हर्षित गोलंदाज आहे.

नॉर्थ झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन दरम्यान 28 जूनपासून सामना सुरु झाला. दिल्ली, पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या अनुभवी खेळाडूंसमोर नॉर्थ-ईस्टची टीम कमकुवत आहे. या मॅचमध्ये नॉर्थची टीम प्रभावी ठरेल, असा अंदाज होता. घडलं सुद्धा तसच. या मॅचमध्ये नवव्या नंबरवर येऊन एक फलंदाज शतक ठोकेल याची कोणीच कल्पना केली नव्हती.

12 फोर, 9 सिक्स

मॅचच्या दुसऱ्यादिवशी हर्षित राणा स्फोटक इनिंग खेळला. राणाने फक्त 75 चेंडूत शतक ठोकलं. हे त्याच्या फर्स्ट क्लास करियरमधलं पहिलं शतक आहे. 21 वर्षाचा दिल्लीचा हा गोलंदाज .या इनिंगआधी फक्त 5 सामने खेळला होता. त्याने 152 धावा केल्या होत्या. हर्षित राणा 86 चेंडूत नाबाद 122 धावांची इनिंग खेळला. यात त्याने 12 चौकार आणि 9 सिक्स मारले. 102 धावा त्याने फक्त फोर-सिक्सने केल्या.


आयपीएलमध्ये कुठल्या टीमकडून डेब्यु?

दिल्लीच्या या युवा खेळाडूने आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून डेब्यु केला होता. राणाने आपल्या गोलंदाजीचा वेग आणि बाऊन्सने फलंदाजांना हैराण केलं होतं. त्याने बॅटने आपली क्षमता दाखवून दिली होती.

नॉर्थ झोनचा विशाल स्कोर

हर्षितच्या आधी नॉर्थ झोनच्या अन्य फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. मॅचच्या पहिल्याच दिवशी ओपनर ध्रुव शॉरीने 135 धावा ठोकल्या. दुसऱ्यादिवशी हर्षितच्या आधी हरियाणाचा 19 वर्षांचा ऑलराऊंडर निशांत सिंधुने 150 धावा फटकावल्या. त्या बळावर नॉर्थ झोनने पहिल्या इनिंगमध्ये 8 विकेट गमावून 540 धावांवर डाव घोषित केला.