AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs NZ : बेझ बॉलचा डब्बा गुल, Kyle Jamieson चा पंच, इंग्लंडचं 140 धावांवर पॅकअप

England vs New Zealand 1st Test : कायल जेमीसन याने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये 5 विकेट्स घेत जबरदस्त कामगिरी केली. न्यूझीलंडला जेमीसनच्या या 5 विकेट्सच्या जोरावर इंग्लंडला 140 रन्सवर रोखण्यात यश आलं.

ENG vs NZ : बेझ बॉलचा डब्बा गुल, Kyle Jamieson चा पंच, इंग्लंडचं 140 धावांवर पॅकअप
Kyle Jamieson Fifer Image Credit source: @BLACKCAPS X Account
| Updated on: Jun 04, 2026 | 10:54 PM
Share

पाहुण्या न्यूझीलंड क्रिकेट टीमने यजमान इंग्लंडला पहिल्या कसोटी (England vs New Zealand 1st Test) सामन्यातील पहिल्या दिवशी पहिल्या डावात 150 धावांच्या आत गुंडाळलं आहे. न्यूझीलंडने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये इंग्लंडचं 39.4 ओव्हरमध्ये 140 रन्सवर पॅकअप केलं. इंग्लंडला गुंडाळण्यात कायल जेमीसन याने प्रमुख भूमिका बजावली. इंग्लंडच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. हॅरी ब्रूक याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे इंग्लंडची घरच्या मैदानात अशी वाईट स्थिती झाली. त्यामुळे न्यूझीलंडकडून कडक बॅटिंग करुन मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. त्यामुळे न्यूझीलंड आता इंग्रजांसमोर कशी बॅटिंग करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंडची बॅटिंग आणि घसरगुंडी

न्यूझीलंडने टॉस जिंकला. कॅप्टन टॉम लॅथम याने फिल्डिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून एमिलीयो गे याचं पदार्पण झालं. एलिस्टर कुक याने एमिलियो गे याला कॅप दिली. त्यामुळे गेकडून इंग्लंडच्या चाहत्यांना मोठी आशा होती. मात्र एमिलियोने निराशा केली. एमिलियोने 14 बॉलमध्ये 8 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर बेन डकेट आणि जेकब बेथल या दोघांनी काही वेळ इंग्लंडला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांना यात फार यश आलं नाही. बेन डकेट आणि जेकब बेथल हे दोघे झटपट आऊट झाले. डकेटने 19 आणि बेथलने 6 रन्स केल्या.

इंग्लंडच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे जो रुट याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र रुटनेही निराशा केली. केन विलियमसन याने रुटचा स्लिपमध्ये जबरदस्त कॅच घेतला. रुट अवघी 1 धाव करुन माघारी परतला. जेमी स्मिथ यानेही 1 रन करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कॅप्टन बेन स्टोक्स याने इंग्लंडला अनेकदा सावरलं आहे. मात्र स्टोक्स इथे अपयशी ठरला. स्टोक्स 12 धावांवर बाद झाला. गस एटकीन्सन याने 4 रन्स केल्या.

हॅरी ब्रूक याची एकाकी झुंज सुरु होती. त्यामुळे हॅरीकडून चाहत्यांना मोठी आशा होती. मात्र हॅरीला अर्धशतकानंतर फार वेळ मैदानात तग धरता आला नाही. हॅरीने 71 बॉलमध्ये 56 केल्या. ओली रॉबिन्सन 1 धाव करुन आऊट झाला. शोएब बशीर 14 धावांवर बाद होताच इंग्लंडचा डाव आटोपला. तर जोश टंग याने नाबाद 10 धावा केल्या. कायल जेमीसन याला नॅथन स्मिथ आणि विलियम ओरुर्क या दोघांनीही चांगली साथ दिली. नॅथनने 3 आणि विलियमने 2 विकेट्स मिळवल्या.

Follow Us
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका