AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs NZ : इंग्लंड पहिल्या कसोटीसाठी सज्ज, न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यासाठी 12 खेळाडूंची नावं जाहीर, दोघांना पहिल्यांदाच संधी

England vs New Zealand 1st Test : इंग्लंड क्रिकेट टीम न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे. निवड समितीने नेहमीप्रमाणे सामन्याच्या काही तासांआधी टीम जाहीर केली आहे. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली.

ENG vs NZ : इंग्लंड पहिल्या कसोटीसाठी सज्ज, न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यासाठी 12 खेळाडूंची नावं जाहीर, दोघांना पहिल्यांदाच संधी
England Cricket Team LordsImage Credit source: @englandcricket x account
| Updated on: Jun 02, 2026 | 11:30 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आपल्याकडे ट्रॉफी कायम राखण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. तर टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध 6 जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर उभयसंघात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. त्याआधी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला 4 जूनपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडने परंपरेनुसार सामन्याच्या काही तासांआधी टीम जाहीर करत आघाडी घेतली आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 2 जून रोजी पहिल्या कसोटी सामन्यासाठी 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. उभसंघातील पहिला सामना हा 4 ते 8 जून दरम्यान लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जोफ्रा आर्चर याचा पहिल्या सामन्यासाठी समावेश करण्यात आलेला नाही. आर्चर दुसऱ्या सामन्यासाठी टीमसोबत जोडला जाऊ शकतो. उभयसंघातील दुसरा सामना हा 17 जूनपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल इथे होणार आहे.

दोघांना पहिल्यांदाच संधी, एकाचं 2 वर्षांनंतर कमबॅक

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने पहिल्या सामन्यासाठी पहिल्यांदाच दोघांची निवड केली आहे. एमिलियो गे आणि सोनी बेकर यांना स्थान देण्यात आलं आहे. एमिलियो हा फलंदाज आहे. सोनी वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे या दोघांनाही पदार्पणाची संधी मिळणार का? याची प्रतिक्षा असणार आहे.

ओली रॉबिन्सनचं कमबॅक

तसेच ओली रॉबिन्सन याचं न्यूझीलंड विरूद्धच्या या मालिकेनिमित्ताने कसोटी संघात कमबॅक झालं आहे. रॉबिन्सन याने अखेरचा कसोटी सामना हा 2024 साली फेब्रुवारी महिन्यात खेळला होता. त्यामुळे रॉबिन्सन याला 28 महिन्यानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार का? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा 12 सदस्यीय संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), गस ॲटकिन्सन, सॉनी बेकर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, बेन डकेट, एमिलियो गे, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जेमी स्मिथ (विकेटकीपर) आणि जॉश टंग.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...