इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या एका निर्णयामुळे IPL 2022 स्पर्धेला बसू शकतो मोठा फटका

| Updated on: Jan 13, 2022 | 6:12 PM

अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) पराभव इंग्लंडच्या चांगलाच जिव्हारी लागला असून याचा फटका IPL 2022 स्पर्धेला बसू शकतो. अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा मानहानीकारक पराभव झाला.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या एका निर्णयामुळे IPL 2022 स्पर्धेला बसू शकतो मोठा फटका
Follow us on

मुंबई: अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) पराभव इंग्लंडच्या चांगलाच जिव्हारी लागला असून याचा फटका IPL 2022 स्पर्धेला बसू शकतो. अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा मानहानीकारक पराभव झाला. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड (England Cricket board) खेळाडूंवर काही बंधन घालण्याचा विचार करत आहे. भारत दौऱ्यात इंग्लंडचा पराभव झालाच, पण मायदेशातील मालिकेतही इंग्लंडचा संघ मागे पडलाय. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंवर लगाम लावण्याच्या विचारात आहे.

फटका कसा बसणार?

इंग्लिश क्रिकेटपटूंच्या IPL 2022 स्पर्धेत खेळण्यावर काही बंधन येऊ शकतात. आतापर्यंत इंग्लिश खेळाडू IPL चा संपूर्ण मोसम खेळण्यासाठी उपलब्ध असतात. पण आता असं होण कठीण दिसतय. कसोटी क्रिकेटच्या तयारीसाठी त्यांना एक ठराविक वेळेसाठी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळू शकते.

हा प्रस्ताव स्वीकारणार?

इंग्लंड क्रिकेट बोर्डाला कसोटीमध्ये आपल्या संघाचा खेळ सुधारण्यासाठी काही सल्ले मिळाले आहे. दी टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर बंदी घालण्याचाही सल्ला यामध्ये आहे. इंग्लिश टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाइल्स यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट कमिटीचे प्रमुख अँड्र्यू स्ट्रॉस यांना हे सल्ले दिले आहेत. पुढच्या मोसमात इंग्लिश संघाला कसोटीसाठी चांगली तयारी करता यावी, यासाठी हे सल्ले दिले आहेत.

इंग्लिश क्रिकेट बोर्डाने आयपीएल बद्दल आलेल्या प्रस्तावावर कुठलाही निर्णय घेतला, तर त्याचा IPL 2022 स्पर्धेला फटका बसू शकतो. पण इंग्लंडच्या खेळाडूंचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. इंग्लिश खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फ्रेंचायजींकडून घसघशीत रक्कम दिली जाते.