नंबर 1 टी 20 गोलंदाजाकडून चौकार-षटकारांचा पाऊस, 6 बॉल मध्ये मॅचच फिरवली, पहा VIDEO

जगातील नंबर 1 टी 20 गोलंदाज सोफी एक्लेस्टोनने (sophi ecclestone) सोमवारी आपल्या बॅटने कमाल दाखवली. सोफीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात (T 20 Match) अवघ्या 12 चेंडूत नाबाद 33 धावा फटकावल्या. ए

नंबर 1 टी 20 गोलंदाजाकडून चौकार-षटकारांचा पाऊस, 6 बॉल मध्ये मॅचच फिरवली, पहा VIDEO
eng vs sa
Image Credit source: ecb screengrab
| Updated on: Jul 26, 2022 | 3:49 PM

मुंबई: जगातील नंबर 1 टी 20 गोलंदाज सोफी एक्लेस्टोनने (sophi ecclestone) सोमवारी आपल्या बॅटने कमाल दाखवली. सोफीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात (T 20 Match) अवघ्या 12 चेंडूत नाबाद 33 धावा फटकावल्या. एक्लेस्टोनने शेवटच्या षटकात 26 धावा चोपल्या. त्या बळावर इंग्लंडने निर्धारित 20 ओव्हर्स मध्ये 176 धावांची विशाल धावसंख्या (ENG vs SA) उभारली. दक्षिण आफ्रिकेला या धावसंख्येचा पाठलाग करणं जमलं नाही. त्यांचा 38 धावांनी पराभव झाला. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीज मध्ये 3-0 ने क्लीन स्वीप केलं. बर्मिंघम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये इंग्लंडने सुवर्णपदकासाठी आपली दावेदारी अजून मजबूत केली आहे.

सोफी एक्लेस्टोनचा जलवा

सोफी एक्लेस्टोनने दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज मसाबात क्लासची जोरदार धुलाई केली. क्लासच्या एका षटकात एक्लेस्टोनने 26 धावा वसूल केल्या. यात 3 चौकार आणि 2 षटकार होते. क्लासच्या पहिल्या दोन चेंडूंवर एक्लेस्टोनने दोन चौकार वसूल केले. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर एक्लेस्टोनने षटकार खेचला. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा एक्लेस्टोनने चौकार लगावला. डावाचा शेवट तिने षटकारानेच केला. 19 षटकाअखेरीस इंग्लंडची धावसंख्या फक्त 150 होती. 20 व्या ओव्हरनंतर टीमचा स्कोर 176 झाला.

एक्लेस्टोनची गोलंदाजी मध्येही कमाल

एक्लेस्टोनने या नंतर गोलंदाजीतही कमाल दाखवली. तिने 4 षटकात 24 धावा देऊन 2 विकेट काढल्या. एक्लेस्टोनला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. एक्लेस्टोनने सीरीज मध्ये 5 विकेट काढल्या. प्रति ओव्हर तिचा इकॉनमी रेट 6 धावा होता.

एकही वनडे किंवा टी 20 सामना जिंकता आला नाही

दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांची इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात जोरदार धुलाई झाली. खासकरुन मसाबात क्लासच्या 4 ओव्हर मध्ये 62 धावा फटकावण्यात आल्या. तिने टाकलेल्या 24 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. अयाबोंगे खाकाने 4 ओव्हर्स मध्ये 33 धावा दिल्या. इंग्लंड दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ एकही वनडे किंवा टी 20 सामना जिंकू शकला नाही.