
श्रीलंकेला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने श्रीलंकेवर 5 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. आता त्यानंतर दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांनी दुसऱ्या सामन्याआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण तयार असल्याचंच एकाप्रकारे सांगितलंय. धनंजया डी सिल्वा श्रीलंकेचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर ओली पोप बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचं नेतृत्व करतोय. उभयसंघातील दुसरा कसोटी सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार? हे आपण जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना गुरुवार 29 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन येथे होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.
इंग्लंड-श्रीलंका दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज
A Test at Lord’s 👉 Pure cricketing gold ✨ #SonySportsNetwork #ENGvSL pic.twitter.com/oyKarbwIsK
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 28, 2024
दुसर्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
इंग्लंड विरूद्धच्या दुसर्या कसोटीसाठी श्रीलंकेची प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल,कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रत्नाययके.