AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोलंदाजाची मेहनत शून्य! जेसन रॉयने फुकटात दिली विकेट, नेमकं काय घडलं पाहा Video

ईटीपीएल 2026 स्पर्धेत ग्लासगो कॉस्मिक आणि डब्लिन गार्डियन्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. यात जेसन रॉयनने गोलंदाजाला फुकटात विकेट दिली. कसं काय ते समजून घ्या.

गोलंदाजाची मेहनत शून्य! जेसन रॉयने फुकटात दिली विकेट, नेमकं काय घडलं पाहा Video
गोलंदाजाची मेहनत शून्य! जेसन रॉयने फुकटात दिली विकेट, नेमकं काय घडलं पाहा VideoImage Credit source: ETPL
| Updated on: Aug 29, 2026 | 9:35 PM
Share

युरोपियन टी20 प्रीमियर लीग अर्थात ईटीपीएल स्पर्धेची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळत असून क्रीडाप्रेमींचं चांगलंच मनोरंजन होत आहे. या स्पर्धेत ग्लासगो कॉस्मिक आणि डब्लिन गार्डियन्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात एक प्रकार पाहून क्रीडाप्रेमींना हसण्याशिवाय पर्याय उरला नाही. कारण फलंदाज स्वत:च्या चुकीमुळे आणि विचित्र पद्धतीने बाद झाला होता. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून इंग्लंडचा ओपनर जेसन रॉय होता. त्याने या सामन्यात जबरदस्त खेळी केली होती. पण एक चुकीचा फटका मारण्याच्या नादात फसला आणि गोलंदाजाला फुकटची विकेट देऊन बसला. कारण हा फटका मारताना स्वत:च चेंडू स्टम्पवर मारला.

डब्लिन गार्डियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना ग्लास्गो कॉस्मिकने 20 षटकांत 5 बाद 183 धावा केल्या होत्या. सलामीला आलेल्या जेसन रॉयने 37 चेंडूंमध्ये 60 धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे ग्लासगो कॉस्मिक चांगल्या स्थिती आला होता. त्यामुळे त्याने जोखिम घेत फटकेबाजी करण्याची सुरूवात केली. पण 16 व्या षटकात हीच जोखीम त्याच्या अंगलट आली. वेगवान गोलंदाज मॅट होलार्टच्या गोलंदाजीच्या दुसऱ्या चेंडूवर विचित्र फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि फसला. खरं तर जेसन रॉय असा फटका मारत नाही. त्यामुळे त्याचा प्रयोग फसला.

होलार्डने ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला होता. पण हा चेंडू खेळण्यासाठी जेसन रॉय आधीच बाहेर निघाला होता. त्याने या चेंडूवर स्कूप शॉट खेळून चेंडू फाइन लेगच्या दिशेने चौकार मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू वेगाने आला आणि उसळी मात्र फारच कमी होती. त्यामुळे हा फटका मारताना टायमिंग चुकलं. चेंडू कनेक्ट केला पण थेट स्टंपवर आदळला. त्यामुळे जेसन रॉयला नशिबाला दोष देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यालाही तंबूकडे जाताना आपल्या नशिबावर हसावं लागलं.

ग्लासको कॉस्मिकने विजयासाठी दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना डब्लिन गार्डियन्स संघाने नांगी टाकली. डब्लिन गार्डियन्सचा संघ 19.3 षटकांत सर्वबाद 150 धावाच करू शकला आणि 33 धावांनी पराभव झाला.

Follow Us
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त