10 दिवसातच हा माजी भारतीय क्रिकेटर राजकारणातून निवृत्त, काय आहे कारण?

अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी राजकारणात आपलं नशीब आजमवलं आहे. अनेकांनी निवडणूक देखील लढवली आहे. काही जण आमदार-खासदार झाले. अशात १० डिसेंबर रोजी राजकारणात प्रवेश करणाऱ्या एका माजी भारतीय क्रिकेटरने अवघ्या १० दिवसातच राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.

10 दिवसातच हा माजी भारतीय क्रिकेटर राजकारणातून निवृत्त, काय आहे कारण?
| Updated on: Jan 06, 2024 | 8:47 PM

Ambati Rayudu : माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) सोडण्याची घोषणा केली आहे. रायडूने १० दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशच्या सत्ताधारी पक्ष वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. 28 डिसेंबरला रोजी वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर रायडूला निवडणुकीचं तिकीट दिले जाईल अशी चर्चा सुरु होती. पण ही चर्चा सुरु असताना त्याने राजकारणातून माघार घेण्याची घोषणा करुन टाकली. रायडूने ‘X’ वर एक पोस्ट लिहिले आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले की, त्याने काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.’

अंबाती रायडूने लिहिले, “प्रत्येकाला कळवत आहे की मी YSRCP पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.”

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी 28 डिसेंबर 2023 रोजी रायडूचे त्यांच्या पक्षात स्वागत केले होते. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी हे देखील यावेळी उपस्थित होते.


रायडू सुरुवातीला काँग्रेस पक्षात जाण्याची चर्चा होती. पण त्याने वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रायडू हा मूळचा गुंटूरचा रहिवासी आहे. त्याने जुलै 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि मे 2023 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेतली होती. रायडूच्या नावावर एकूण 1694 धावा आहेत. नाबाद 124 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

&

रायडूने भारतीय क्रिकेट संघासाठी रायडूने 55 वनडे सामने खेळले आहेत. 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने देखील रायडूने भारताकडून खेळले आहेत.