‘आणखी चांगला क्रिकेटर होऊ शकलो असतो’, वीरेंद्र सेहवागने क्रिकेट सोडल्यानंतर 6 वर्षांनी व्यक्त केली खंत, म्हणाला…

वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं ठोकली आहेत. त्याने 104 कसोटी सामन्यांत 8000 हून अधिक धावा केल्या आहेत.

'आणखी चांगला क्रिकेटर होऊ शकलो असतो', वीरेंद्र सेहवागने क्रिकेट सोडल्यानंतर 6 वर्षांनी व्यक्त केली खंत, म्हणाला...
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 4:48 PM

मुंबई : भारतीय संघाचा (Team India) सर्वांत स्फोटक फलंदाज अशी अनोखी ओळख असणारा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) 9 जून रोजी एक मोठा खुलासा केला. त्याने योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळालं असतं तर आणखी चांगला खेळ करु शकलो असतो अशी खंत व्यक्त केली. मंसूर अली खान पतौडी(Mansoor Ali Khan Pataudi), सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि क्रिस श्रीकांत (Kris Srikanth) यांनी फुटवर्क ठिक करायला मदत केली खरी पण तीच मदत लवकर मिळाली असती तर बरं झालं असतं असं सेहवाग म्हणाला. वीरेंद्र सेहवागने 2015 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दरम्यान त्याने 104 कसोटी सामन्यांत 8000 हून अधिक धावा केल्या आहेत. तो एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं ठोकली आहेत. सेहवागने माजी क्रिकेटर संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्यासोबत मिळून Cricuru नावाचे एक क्रिकेट लर्निंग अॅप सुरु केले आहे. ज्याद्वारे क्रिकेट शिकू इच्छिनाऱ्यांना फिस देऊन क्रिकेटबाबत महत्वाच्या टीप्स मिळणार आहेत. (Former Indian Cricketer Virendra Sehwag says Sunil Gavaskar Kris Srikanth Pataudi Helped me For Improving Footwork Wish I got This Advice Early)

या अॅपच्या लॉचिंग वेळी सेहवाग म्हणाला, ”मी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलो. तेव्हा अनेकांनी माझ्या फुटवर्कवर टीका केली होती. पण कोणीच मला त्यात सुधार आणण्याबाबत काही सांगितले नाही. अखेर पतौडी, सुनील गावस्कर आणि क्रिस श्रीकांत यांनी मला फुटवर्कमध्ये सुधारणेबाबत चांगले सल्ले दिले. ज्यामुळे मी माझ्या खेळात बराच सुधार आणू शकलो. पण हेच सल्ले मला आधी मिळाले असते तर मी आणखी धावा करुन खेळ सुधारु शकलो असतो.”

क्रिकेटही शिका ऑनलाईन

सेहवाग आणि बांगर यांनी मिळून सुरु केलेल्या Cricuru या लर्निंग अॅपमुळे घरबसल्या क्रिकेटमधील डावपेच शिकता येणार आहेच. हे एक क्रिकेटच्या कोचिंग क्लासप्रमाणे असेल. याठिकाणी क्रिकेटपटूसोबत संभाषण आणि शिकवणीही मिळेल. अनेक क्रिकेटर्स महत्त्वपूर्ण टीप्स याठिकाणी देतील ज्यामुळे मैदानात खेळताना नवख्या क्रिकेटपटूंना फार मदत होईल. फीज भरुन या अॅपवर शिकवणी घेता येणार आहे.

सेहवागची क्रिकेट कारकीर्द

अनेक वर्ष भारताचा सलामीवीर राहिलेला वीरेंद्र सेहवाग 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघातही होता. त्याने 104 कसोटी सामन्यांत 8 हजार 586 धावा केल्या आहेत. ज्यात 23 शतकांसह 32 अर्धशतकांचा समावेश होतो. 6 वेळा त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावा केल्या आहेत. तो असा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं ठोकली आहेत. यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये सेहवागने 251 सामन्यांत 8 हजार 273 धावा केल्या आहेत. ज्यात 15 शतकांसह 38 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एक द्विशतक ही ठोकलं आहे. टी-20 मध्ये केवळ 19 सामनेच खेळल्याने सेहवागने त्यात 2 अर्धशतकांसह 394 धावांच केल्या आहेत. सेहवाग फिरकी गोलंदाजीही करत असून त्याने 104 कसोटी सामन्यांत 40 विकेट्स मिळवले आहेत. तर 251 एकदिवसीय सामन्यात 96 विकेट्स पटकावले आहेत.

हे ही वाचा :

राहुल द्रविडने 13 वर्षांपूर्वी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यामुळे बदललं जीवन, भारताच्या दिग्गज खेळाडूची कबुली

WTC Final : भारतीय संघ मोठ्या पेचात, महत्वाच्या खेळाडूला बाहेर बसवण्याची शक्यता

WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी

(Former Indian Cricketer Virendra Sehwag says Sunil Gavaskar Kris Srikanth Pataudi Helped me For Improving Footwork Wish I got This Advice Early)

Non Stop LIVE Update
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.