IPL 2024 : चेन्नईला प्लेऑफआधी मोठा झटका, हा स्टार बॉलर आऊट!

IPL 2024 Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सची प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार लढाई सुरु आहे. अशातच चेन्नईला मोठा झटका लागला आहे.

IPL 2024 : चेन्नईला प्लेऑफआधी मोठा झटका, हा स्टार बॉलर आऊट!
chenni super kings huddle talk,Image Credit source: CSK X Account
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 4:26 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात आता प्लेऑफसाठीच्या 4 जागांसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. आरसीबीने 4 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध विजय मिळवला. आरसीबीचा हा सलग तिसरा विजय ठरला. आरसीबीने या विजयासह आपलं प्लेऑफमधील आव्हान कायम राखलंय. तर आज रविवारी 5 मे रोजी डबल धमाका आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं आवश्यक आहे. अशात चेन्नईच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नईचा मॅचविनर गोलंदाज हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. सीएसकेने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान आणि मॅचविनर गोलंदाजाला दुखापत चांगलीच महागात पडली आहे. मथीशा पथिराणा याला हॅमस्ट्रिंग दुखापत झालीय. तो सध्या या दुखापतीवर उपचार घेत आहे. या दुखापतीतून बरं होण्यासाठी मथीशा आता मायदेशी अर्थात श्रीलंकेत परतणार आहे, अशी माहिती चेन्नई सुपर किंग्सच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. मथीशाला हॅमस्ट्रिंगचा त्रास आहे. मथीशाला मार्च महिन्यात बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात

मथीशा पथीराणा याने आयपीएलच्या 17 व्या मोसमात चेन्नईसाठी 6 सामने खेळले आहेत. मथीशाने या 6 सामन्यांमध्ये 7.68 च्या इकॉनॉमीने धावा देत 13 विकेट्स घेतल्या आहेत. मथीशाने लवकरात लवकर या दुखापतीतून सावरावं,अशा शुभेच्छा चेन्नई सुपर किंग्स टीमने दिल्या आहेत.

चेन्नईला मोठा झटका

चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे, समीर रिझवी, सिमरजीत सिंग, रशीद शेख, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, मथीशा पाथीराना, रचिन रवींद्र, अजय जाधव मंडल, आर.एस. हंगरगेकर, महेश तीक्षना, निशांत सिंधू आणि अरावेली अवनीश.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.