बाप तो बाप… बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बारामती लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत होताना दिसणार आहे. राज्यभरात आज नेत्याच्या १३ जाहीर सभा होत आहेत. पाच ठिकाणी रॅली निघणार आहेत. दरम्यान, बारामतीत अजित पवारांच्या ५ जाहीरसभा तर शरद पवारांच्या ३ जाहीर सभांचं आयोजन आज करण्यात आलंय.
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या ७ तारखेला पार पडणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात सुद्धा तिसऱ्या टप्प्याच मतदान होणार आहे. दरम्यान, या लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत होताना दिसणार आहे. राज्यभरात आज नेत्याच्या १३ जाहीर सभा होत आहेत. पाच ठिकाणी रॅली निघणार आहेत. दरम्यान, बारामतीत अजित पवारांच्या ५ जाहीरसभा तर शरद पवारांच्या ३ जाहीर सभांचं आयोजन आज करण्यात आलंय. शरद पवारांच्या सभेच्या ठिकाणी बाप तो बाप रहेगा अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. सातारा येथे झालेल्या भर पावसातील सभेतील शरद पवार यांचा फोटो देखील या सभास्थळी कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात आलाय. सभास्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार यांच्या भाषणातील काही वाक्य देखील दिसताय… बघा सभास्थळावरील नेमके कोणते फोटो आणि बॅनर वेधून घेताय लक्ष…
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

