Gautam Gambhir : तिलक-नितीशच्या खेळीने भारावला गंभीर, फक्त तीन शब्दांची भन्नाट प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला हेड कोच?

भारताने न्यूझीलंडविरुद्ध ४ गडी राखून शानदार विजय मिळवला. त्यानंतर आता मुख्य कोच गौतम गंभीरने खास प्रतिक्रिया दिली आहे. त्याने केवळ तीनच शब्दांमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

Gautam Gambhir : तिलक-नितीशच्या खेळीने भारावला गंभीर, फक्त तीन शब्दांची भन्नाट प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला हेड कोच?
Gautam Gambhir X Post
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 10:50 PM

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने अशक्य वाटणारा विजय मिळवला. 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था 112 धावांत 6 विकेट्स अशी झाली होती. सामना हातातून निसटणार असं वाटत असतानाच तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी बाजी पलटवली. भारताच्या या विजयाची चर्चा सुरू असतानाच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गंभीरने अवघ्या तीन शब्दांत युवा खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं.

गौतम गंभीर यांची खास पोस्ट चर्चेत

न्यूझीलंडविरुद्धच्या या थरारक विजयानंतर गौतम गंभीरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रतिक्रिया लिहिवी आहे. त्यांनी ‘Boys Becoming Men’ असं लिहिलं. युवा खेळाडूंनी दबावाच्या परिस्थितीत दाखवलेला संयम आणि जिद्द या शब्दांतून गंभीरने त्यांचं कौतुक केल्याचं दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयासोबतच गंभीर यांच्या या छोट्या पोस्टचीही चर्चा होत आहे.

Loading...

तिलक, नमन आणि नितीश यांनी फिरवला सामना

भारताची अवस्था 112 धावांत 6 विकेट्स अशी असताना तिलक वर्मा याने डावाची जबाबदारी सांभाळली. त्याआधी नमन धीरने 17 चेंडूंत 31 धावांची आक्रमक खेळी करत भारताच्या धावगतीला वेग दिला. नमन बाद झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डीने तिलकला साथ दिली. तिलकने 26 चेंडूंत नाबाद 51 धावा केल्या, तर नितीशने 13 चेंडूंत नाबाद 26 धावा ठोकल्या. दोघांनी अवघ्या 30 चेंडूंत नाबाद 69 धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने 1 चेंडू शिल्लक असताना 4 विकेट्सने सामना जिंकला.

 

 

 

गंभीरच्या विश्वासाला युवा खेळाडूंची साथ

एकीकडे भारताच्या प्रमुख फलंदाजांच्या विकेट्स पडत असताना युवा खेळाडूंनी सामना हातात घेतला. तिलक वर्मा, नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या कामगिरीमुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या विजयानंतर गंभीरने केलेली ‘Boys Becoming Men’ ही पोस्ट युवा खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक करणारी ठरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us