IPL 2026: एका दिवसात 2 कर्णधारांचा गेम, हार्दिकनंतर दुसऱ्या टीमचा कॅप्टनही आऊट, काय झालं?

IPL 2026 : शनिवारी 4 एप्रिल रोजी 2 प्रमुख संघांच्या आणि अनुभवी कर्णधारांना आयपीएल 2026 स्पर्धेतील सामन्यांना मुकावं लागलं आहे. हार्दिक पंड्या याच्यानंतर शुबमन गिल यालाही आज आपल्या टीमसाठी खेळता आलं नाही.

IPL 2026: एका दिवसात 2 कर्णधारांचा गेम, हार्दिकनंतर दुसऱ्या टीमचा कॅप्टनही आऊट, काय झालं?
Hardik Pandya Mi Ipl
Image Credit source: News 9
| Updated on: Apr 04, 2026 | 10:00 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) पहिल्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात 4 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीचा हा सलग दुसरा विजय ठरला. दिल्लीचा हा 19 व्या पर्वातील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममधील पहिला विजय ठरला. मुंबईला या पराभवाआधी मोठा झटका लागला. मुंबईला या सामन्यात नियमित कर्णधार आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्याशिवाय मैदानात उतरावं लागलं. हार्दिकला बरं नसल्याने त्याला या सामन्याला मुकावं लागलं. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याने मुंबईचं नेतृत्व केलं.

मुंबई इंडियन्सनंतर गुजरात टायटन्सला धक्का

दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यानंतर डबले हेडरमधील दुसऱ्या सामन्यातही असंच काही चित्र पाहायला मिळालं आहे. दुसऱ्या संघालाही आपला नियमित कर्णधार बदलावा लागला आहे. डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत.

जीटी विरुद्ध राजस्थान हा सामना गुजरातचं होम ग्राउंड असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र या सामन्यातून लोकल बॉय आणि गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. शुबमनच्या अनुपस्थितीत फिरकीपटू राशिद खान हा कॅप्टन म्हणून टॉससाठी आला. राशिदने टॉस झाल्यानंतर शुबमनला दुखापत झाल्याची माहिती दिली. राशिद खान याला टी 20 आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेृतत्वाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे राशिद शुबमनच्या अनुपस्थितीत कसं नेतृत्व करतो याकडेही टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.

शुबमनच्या गिल याच्या जागी कुणाला संधी?

शुबमनला जरी या सामन्यात खेळता येणार नसलं तर त्याला झालेली दुखापत ही दुसऱ्या खेळाडूच्या पथ्यावर पडली आहे. शुबमनच्या जागी युवा खेळाडू कुमार कुशाग्र याला संधी देण्यात आली आहे. कुमार विकेटकीपिंगसह बॅटिंगही करतो. मात्र अनुभवी खेळाडू असताना या अनकॅप्ड खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी फार संधी मिळत नाही. मात्र शुबमनच्या दुखापतीमुळे कुशाग्रला संधी मिळाली आहे. त्यामुळे कुशाग्र या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.

गुजरात-राजस्थानपैकी वरचढ कोण?

दरम्यान गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यात आतापर्यंत एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. गुजरातने या 8 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. गुजरातने 6 सामन्यांमध्ये राजस्थानला पराभवाची धुळ चारली आहे. तर राजस्थानने 2 सामने जिंकले आहेत.

Follow Us