AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs CSK Live Streaming : गुजरातसाठी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर महत्त्वाचा सामना, चेन्नई जिंकणार?

Gujarat Titans vs Chennai Super Kings IPL 2026 Live Scorecard : क्रिकेट चाहत्यांना गुरुवारी 21 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.जाणून घ्या.

GT vs CSK Live Streaming : गुजरातसाठी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर महत्त्वाचा सामना, चेन्नई जिंकणार?
GT vs CSK IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 21, 2026 | 1:57 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 66 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील 14 वा आणि शेवटचा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. गुजरातने प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. मात्र त्यानंतरही गुजरातसाठी हा सामना टॉप 2 च्या हिशोबाने निर्णायक असणार आहे. तर चेन्नईला प्लेऑफमधील जर तरचं आव्हान राखण्यासाठी विजयी होणं बंधनकारक आहे. त्यामुळे चेन्नई जिंकणार की गुजरात आणखी 2 गुण मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कधी?

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना गुरुवार 21 मे रोजी होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर मोबाईलवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

चेन्नई-गुजरात दुसऱ्यांदा आमनेसामने

चेन्नई-गुजरात दोन्ही संघांची ही या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात 26 एप्रिलला आमनासामना झाला होता. तेव्हा गुजरातने चेन्नईवर 8 विकेट्स विजय मिळवला होता. त्यामुळे आता चेन्नईकडे या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातसाठी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतरही हा सामना महत्त्वाचा आहे. गुजरातला टॉप 2 मध्ये कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहचण्याची 2 संधी मिळते. त्यामुळे कायमच टॉप 2 साठी चुरस असते. त्यामुळे गुजरात सामना जिंकून टॉप 2 मध्ये कायम राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...