AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Virat Kohli : उगीच ‘रन मशीन’ नाही म्हणत, कोहलीचे हे विराट विक्रम माहिती आहेत का?

Happy Birthday Virat Kohli : विराट कोहलीने क्रिकेट जगतात भली मोठी कामगिरी केली आहे. त्याचे काही रेकॉर्ड इतिहासजमा करणे खेळाडूंसाठी मोठे आव्हान आहे. त्याने वनडे आणि टेस्ट जीवनात अनेक माईलस्टोन रचले आहेत. विराट केवळ एक खेळाडू नाही तर युग आहे.

Happy Birthday Virat Kohli : उगीच 'रन मशीन' नाही म्हणत, कोहलीचे हे विराट विक्रम माहिती आहेत का?
विराट कोहली
| Updated on: Nov 05, 2025 | 12:19 PM
Share

विराट कोहली केवळ एक नाव नाही. तर एक ब्रँड आहे. त्याने क्रिकेट जीवनात मोठा पल्ला गाठला आहे. त्याची बॅट तळपली की मैदानात एकच जल्लोष होतो. त्याच्या चौकार आणि षटकारांवर प्रेक्षक मैदाना डोक्यावर घेतात. त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम नोंदवले गेले आहेत. आज 5 नोव्हेंबर रोजी विराट हा 37 वर्षांचा झाला आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याने क्रिकेट जगतात अनेक विराट रेकॉर्डस (Top Records of Virat Kohli) तयार केले आहे. तो जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे.

विराट कोहली के टॉप-10 रेकॉर्ड्स

1. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक (51 शतक)

विराट कोहली याने 2023 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा 49 शतकांचा रेकॉर्ड तोडला. त्याने 51 वं शतक जोजले. सध्या या विक्रमाजवळ अजून एकही खेळाडू नाही. त्यामुळे ह रेकॉर्ड तोडणे अजूनही अशक्य आहे.

2. 10,000 धावा करणाऱ्या खेळाडूत समावेश

कोहली वनडेमध्ये 10 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याने सर्वाधिक सरासरी (59.47) धाव काढल्या. त्याने सचिन, पोटिंग, संगकारा, जयसूर्या सारख्या दिग्गजांपेक्षा तो उजवा ठरला आहे.

3. कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांपैकी सर्वाधिक दुहेरी शतक (7)

विराटने कसोटीमध्ये 7 वेळा दुहेरी शतक ठोकले आहे. भारतीय खेळाडूंमध्ये हा सर्वात मोठा विक्रम आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड सारखे धडाकेबाज फलंदाज पण 6 डबल सेंचुरीपर्यंत पोहचला नाही.

4. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा (973 धावा)

2016 च्या आयपीएल हंगामात विराट कोहलीचे नाव गाजलेले आहे. या वर्षात त्याने 17 सामन्यांमध्ये 973 धाव करत 4 शतकं ठोकली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक व्यक्तिगत स्कोर आहे.

5. ICC टेस्ट रेटिंग पॉइंट्स (937)

कसोटीमध्ये विराट कोहली याने 2018 मध्ये 937 रेटिंग पॉइंट्स मिळाले होते. भारतीय फलंदाजामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा तो खेळाडू ठरला.

6. परदेशात सर्वाधिक शतक (एका मालिकेत 4 शतकं)

विराट कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात 4 शतकं ठोकली होती. त्यानंतर 2025 मध्ये एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये शुभमन गिलने या विक्रमाची बरोबरी केली.

7. कसोटी मालिकेत विराटच्या नेतृत्वात विजयी मालिका (9 सीरीज)

विराट कोहली याच्या नेतृत्वात भारताने सलग 9 कसोटी सामन्यात विजयी मालिका सुरू ठेवली होती. ती खंडीत झाली नाही. रिकी पोटिंगच्या काळात असा विक्रम नोंदवला गेला होता. त्याची विराटने बरोबर केली.

8. वनडे सर्वात वेगवान 10,000 धावा

कोहलीने केवळ 205 डावांमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. त्याने क्रिकेट जगतात मैलाचा दगड रोवला.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!