AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी केलं हँडशेक! सोशल मीडियावर त्याच्याच वक्तव्याचा उपहास

Harbhajan Singh -Shahnawaz Dahani Shakes Hand: भारताची माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी हस्तांदोलन केल्याने सोशल मीडियावर रान पेटलं आहे. अनेक जण त्याच्याच विधानाचा उपहास करत खडेबोल सुनावत आहेत. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

Video: हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी केलं हँडशेक! सोशल मीडियावर त्याच्याच वक्तव्याचा उपहास
Video: हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी केलं हँडशेक! सोशल मीडियावर त्याच्याच वक्तव्याच्या उपहासImage Credit source: PTI/videoScreenshot
| Updated on: Nov 20, 2025 | 7:09 PM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. आता कोणत्याही स्तरावर चर्चा होत नाही. असं खेळाच्या मैदानातही दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये खेळताना दिसतात. पण या स्पर्धेतही नो हँडशेक पॉलिसी ठेवली आहे. आशिया कप स्पर्धा, वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धा, एसीसी रायझिंग स्टार स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी यांनी हस्तांदोलन केल्याने सोशल मीडियावर राग व्यक्त केला जात आहे. अबू धाबी टी10 स्पर्धेत हा प्रकार घडला. 19 नोव्हेंबरला नॉर्दन वॉरियर्सचा सामना अस्पिन स्टालियन्सशी झाला होता. हरभजन सिंग अस्पिन स्टायलिन्सकडून खेळतो आणि संघाचा कर्णधार देखील आहे. तर शाहनवाज दहानी नॉर्दन वॉरियर्स संघाचा खेळाडू आहे.

अस्पिन स्टायलिन्स संघासमोर 115 धावांचं आव्हान होतं. पण दहा षटकात 7 गडी गमवून हरभजनचा संघ फक्त 110 धावा करू शकला. हरभजन सिंगने शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला आणि त्याच्या संघाच्या पराभवावर मोहोर लागली. नॉर्दन वॉरियर्सने हरभजनच्या संघाला 4 धावांनी पराभूत केलं. या विजयाचा शिल्पकार नॉर्दन वॉरियर्सचा शाहनवाज दहानी ठरला. त्याने 2 षटकात 10 धावा देत 2 गडी बाद केले. सामन्याचा निकाल लागल्यानंतर हरभजन सिंग नॉर्दन वॉरियर्सच्या संघासोबत हँडशेक करू लागला. तेव्हा त्याने शाहनवाज दहानी याच्याशी हँडशेक केलं.

हरभजन सिंगने हस्तांदोलन करताना सोशल मीडियावर त्याच्या वक्तव्याचा उपहास केला जात आहे. कारण ऑपरेशन सिंदूर झाले तेव्हा त्याने पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करण्यास विरोध केला होता. इतकंच काय तर जिथपर्यंत पाकिस्तान सुधारत नाही तोपर्यंत क्रिकेट काय व्यापार करण्यासही नकार दिला होता. इतकंच काय पाकिस्तानी क्रिकेटपटूंना महत्त्व देणंही बंद केलं पाहीजे, असं सांगितलं होतं. पण आता त्यानेच हस्तांदोलन केल्याने सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात आहे. याबाबत हरभजन सिंगकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.