
मुंबई: इंग्लंड विरुद्धची (IND vs ENG) टी 20 सीरीज नुकतीच संपली. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली. रविवारी शेवटच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 17 धावांनी पराभव केला. पण एजबॅस्टनच्या मैदानात झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ऑलराऊंडर हार्दिक पंड्याबद्दल (Hardik pandya) दावा करण्यात आलाय. दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताची फिल्डिंग सुरु होती. त्यावेळी हार्दिक पंड्याने रोहित शर्माला (Rohit sharma) शिवी दिली, असं हा व्हायरल व्हिडिओ पाहून दावा करण्यात येत आहे. हार्दिक पंड्याचा आवाज स्टम्पसच्या माइक मध्ये ऐकू येतोय. ज्यात त्याने रोहित बद्दल अपशब्द उच्चारल्याचा दावा करण्यात आला आहे. फक्त 10 ते 15 सेकंदाच्या या व्हिडिओतून नेमक काय कळत नाहीय.
हा व्हिडिओ टि्वटरवर व्हायरल झाला आहे. (#HardikAbusedRohit, #HardikPandya) असे हार्दिक पंड्या विरोधात ट्रेंड निघाले होते. हार्दिक पंड्याने रोहित शर्माला शिवी दिली, असं टि्वटर युजर्सनी म्हटलं होतं. हार्दिक पंड्या घमेंडी असल्याचाही आरोप करण्यात आला होता.
Hardik Pandya is that alpha guy who speaks facts without caring for anyone. Said Kohli is better than Sachin and now he doesn’t Bootlick Rohit just because he is the Captain. He just showed levels to Rohit yesterday.#HardikAbusedRohit
— Sai Krishna??????? (@SaiKingkohli) July 10, 2022
This incident of hardik pandya openly questioning & abusing Rohit Sharma shows that Even players don’t rate the new captain #HardikAbusedRohit
— Yashvi (@BreatheKohli) July 10, 2022
या व्हिडिओ मागच नेमकं सत्य मात्र दुसरचं आहे. हार्दिकने रोहितला शिवी दिलेली नाही. डीआरएस वरुन त्यावेळी चर्चा चाललेली. डीआरएसच्या वेळी माझ ऐकं. कारण मी बॉलिंग करतोय, असं हार्दिक बोलत होता. सीनियर स्पोर्ट्स पत्रकार विक्रांत गुप्ता यांनी व्हिडिओ मागची ही गोष्ट सांगितली. हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिका सीरीजपासून टीम इंडियात पुनरागमन केलं आहे. 2021 टी 20 वर्ल्ड कप पासून तो संघाबाहेरच होता. आयपीएल मधल्या शानदार कामगिरीनंतर त्याचं टीम इंडियात पुनरागमन झालय.