IND vs PAK : टीम इंडियाने पाकिस्तानला गुंडाळलं, विजयासाठी 242 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

India vs Pakistan 1st Innings Highlights And Updates : पाकिस्तानकडून सउद सौद शकील याने सर्वाधिक 62 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियासाठी कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

IND vs PAK : टीम इंडियाने पाकिस्तानला गुंडाळलं, विजयासाठी 242 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
icc champions trophy 2025 team india
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Feb 23, 2025 | 6:51 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला 50 ओव्हरआधीच गुंडाळलं आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला 3 चेंडूंआधी ऑलआऊट केलं. पाकिस्तानला 49.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 241 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 242 धावांचं आव्हान मिळांलं आहे. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानकडून एकाचा अपवाद वगळता एकालाही भारतीय गोलंदांजसमोर टिकता आलं नाही. पाकिस्तानसाठी सौद शकील याने सर्वाधिक धावा केल्या. तर टीम इंडियासाठी चायनामॅन बॉलर कुलदीप यादव याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

पाकिस्तानचा एकमेव खेळाडू अब्रार अहमद हा एकही बॉल न खेळता नाबाद परतला. पाकिस्तानकडून एकूण 10 जणांनी बॅटिंग केली. शाहिन अफ्रिदी याला भोपळाही फोडता आला नाही. तर 9 जणांपैकी दोघांचा अपवाद वगळता इतर 7 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. या 7 फलंदाजांना अपेक्षित सुरुवातही मिळाली. मात्र सौद शकील याचा अपवाद वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. सौदने 76 बॉलमध्ये 5 फोरसह 62 रन्स केल्या.

पाकिस्तानसाठी कॅप्टन मोहम्मद रिझवान याने 46 धावांची खेळी केली. खुशदिल शाह याने 38 धावांचं योगदान दिलं. बाबर आझम 23 धावा करुन माघारी परतला. सलमान आघा याने 19, नसीम शाह याने 14 आणि इमाम उल हक याने 10 धावांचं योगदान दिलं. हरीस रौफ याने 8 आणि तय्यब ताहीर याने 4 धावा केल्या. तर कुलदीप यादव याने पाकिस्तानच्या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हार्दिक पंड्या याने 2 विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद जडेजा या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

पाकिस्तानला 241 धावांवर गुंडाळलं


टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.