AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा लक फॅक्टर! भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यांचा निकाल पाच जणांच्या हाती, आयसीसीची घोषणा

IND vs NZ T20 World Cup 2026 Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याच्या निकालासाठी आयसीसीने पाच जणांवर जबाबदारी सोपवली आहे. चला जाणून घेऊयात..

टीम इंडियाचा लक फॅक्टर! भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यांचा निकाल पाच जणांच्या हाती, आयसीसीची घोषणा
टीम इंडियाचा लक फॅक्टर! भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यांचा निकाल पाच जणांच्या हाती, आयसीसीची घोषणाImage Credit source: Icc X account
| Updated on: Mar 06, 2026 | 7:12 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा विजेता कोण? हे 8 मार्चला स्पष्ट होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यापैकी एक जण जेतेपदाचा मानकरी असणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला आणि न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला पराभूत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे दोन्ही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. आता अंतिम सामन्यात जो संघ चांगला खेळेल त्याला जेतेपद मिळेल यात काही शंका नाही. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ फॉर्मात आहेत. त्यामुळे अंदाज बांधणं देखील कठीण आहे. असं असताना या सामन्यापूर्वी आयसीसीने या सामन्याच्या अधिकारी आणि पंचांची घोषणा केली आहे.

पंच म्हणून कोणाची हाती धुरा?

टी20 वर्ल्डकप 2026 भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि एलेक्स व्हार्फ हे ऑनफिल्ड पंच असतील. रिचर्ड इलिंगवर्थ यांच्या नावाची घोषणा होताच भारतीय क्रीडाप्रेमी खूश झाले आहेत. कारण भारताने 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप जिंकला होतो तेव्हा रिचर्ड इलिंगवर्थ ऑनफिल्ड पंच होते. आता सलग दुसऱ्य़ांदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचगिरी करणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2023 वनडे वर्ल्डकप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत ऑनफिल्ड पंचांची भूमिका बजावली आहे. तर एलेक्स व्हार्फ यांनी आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप 2022 आणि आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप 2023 मध्ये पंचगिरी केली आहे. न्यूझीलंड विरूद्ध दक्षिण अफ्रिका या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात व्हार्फ यांनी ऑनफिल्ड पंचाची भूमिका बजावली आहे.

  • ऑन-फील्ड पंच: रिचर्ड इलिंगवर्थ आणि एलेक्स व्हार्फ
  • तिसरे पंच: अल्लाहुद्दीन पालेकर
  • चौथे पंच एड्रियन होल्डस्टॉक
  • सामनाधिकारी: अँडी पायक्रॉफ्ट

दक्षिण अफ्रिकेचे अल्लाहुद्दीन पालेकर तिसरे पंच असतील. या स्पर्धेतील सहा सामन्यात त्यांनी पंचगिरी केली आहे. तर ड्रियन होल्डस्टॉक यांच्याकडे चौथ्या पंचांची जबाबदारी असणार आहे. तर सामनाधिकारी म्हणून झिम्बाब्वेच्या अँडी पायक्राफ्ट यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आयसीसीने निवडलेल्या या पाच जणांच्या हाती सामन्याचा निर्णय असणार आहे.

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी