AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपांत्य फेरीत इंग्लंडच्या पराभवानंतर मायकल वॉनचा संताप, शिवम दुबेबाबत असं काही बोलून गेला; जर…

IND vs ENG T20 World Cup 2026 Semifinal: भारताने इंग्लंडला उपांत्य फेरीच्या सामन्यात 7 धावांनी पराभूत केलं. खरं तर शेवटच्या षटकात 30 धावांची गरज होती. पण या षटकात 22 आल्या. त्यानंतर मायकल वॉनने शिवम दुबेचा समाचार घेतला आहे.

उपांत्य फेरीत इंग्लंडच्या पराभवानंतर मायकल वॉनचा संताप, शिवम दुबेबाबत असं काही बोलून गेला; जर...
उपांत्य फेरीत इंग्लंडच्या पराभवानंतर मायकल वॉनचा संताप, शिवम दुबेबाबत असं काही बोलून गेला; जर...Image Credit source: PTI
| Updated on: Mar 06, 2026 | 6:47 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना अतितटीचा झाला. या सामना कोणच्याच बाजूने झुकलेला नव्हता. शेवटच्या षटकापर्यंत काय होईल हे सांगता येत नव्हतं. टीम इंडियाला शेवटच्या षटकात 30 धावा रोखण्याचं आव्हान होतं. तर इंग्लंडला पाच षटकारांची गरज होती. अशा स्थितीत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू पार्ट टाइम बॉलर शिवम दुबेच्या हाती सोपवला. हा निर्णय घेतल्यानंतर क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली. कारण या स्पर्धेत शिवम दुबेची गोलंदाजी काही फारशी चालली नव्हती. त्यामुळे हा निर्णय अंगलट यायला नको असं वाटत होतं. त्यात अक्षर पटेलचं शेवटचं षटक शिल्लक होतं असं असूनही शिवम दुबेवर विश्वास टाकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होता. या षटकात शिवम दुबेने 22 धावा दिल्या. खरं तर हे खूपच महागडं षटक होतं. असं असूनही भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.

काय म्हणाला मायकल वॉन?

सामन्यात टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने रोखठोक मत मांडलं आहे. त्याने सांगितलं की, ‘ते सामना जिंकले. पण मी त्या निर्णयाशी सहमत नाही. अक्षर पटेल एक चांगला गोलंदाज आहे. तो सरळ आणि वाइड यॉर्कर टाकू शकतो. शिवम दुबेने मागच्या 3 षटकात 68 धावा दिल्या आहेत. जर त्याने भारतासाठी आणखी षटक टाकलं असतं तर भारत वर्ल्डकपमधून बाहेर असता. जर रविवारी त्याने गोलंदाजी केली तर खूपच वाईट स्थिती असेल.’ मायकल वॉनच्या या इशाऱ्यानंतर अंतिम फेरीत सूर्यकुमार यादव काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागून असेल. त्याला गोलंदाजी देईल की नाही हे सांगणं कठीण आहे.

मायकल वॉनच्या मते, ‘क्रिकेटमध्ये सर्व गोष्टी सरळ आणि साध्या ठेवल्या पाहीजेत. जर तुमच्याकडे अक्षर पटेल सारखा अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडे टाकण्यासाठी बरंच काही आहे. स्ट्राईकला लेफ्ट हँडर होता, पण दुसऱ्या बाजूला जेमी ओव्हरटन होताच. तुम्हाला अनुभवी गोलंदाजाला संधी देणं गरजेच आहे.’

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?