AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद मिळवण्यासाठी टीम इंडियाचा ‘तोडगा’, सामन्यापूर्वी केले दोन बदल

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद फक्त एक विजय दूर आहे. भारताचा अंतिम फेरीचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाने दोन बदल केले आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद मिळवण्यासाठी टीम इंडियाचा 'तोडगा', सामन्यापूर्वी केले दोन बदल
टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद मिळवण्यासाठी टीम इंडियाचा 'तोडगा', सामन्यापूर्वी केले दोन बदलImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 06, 2026 | 6:24 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ भिडणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानात भारताने वनडे वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना खेळला होता. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. या स्पर्धेत एकही सामना भारताने गमावला नव्हता. पण अंतिम सामन्यात पराभव झाल्याने हिरमोड झाला आणि जेतेपदाचं स्वप्न भंगलं. इतकंच काय टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत या मैदानात दोन खेळले होते. पहिल्या सामन्यात भारताने नेदरलँडला 17 धावांनी पराभूत केलं. पण सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. भारताचा टी20 क्रिकेटची या मैदानातील आकडेवारी काही वाईट नाही. भारताने या मैदानात 10 टी20 सामने खेळले आहे. त्यात 7 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यापूर्वी दोन बदल केले आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या हॉटेल आणि स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये बदल केला आहे. हा निर्णय नकारात्मक भुतकाळ पुसून काढण्यासाठी केला असल्याची चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे. हा बदल नवी सुरूवात असणार आहे. रिपोर्टनुसार, वनडे 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, ते हॉटेल नाकारलं आहे. तसेच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होम ड्रेसिंग रूम ऐवजी विजिटिंग संघाचं ड्रेसिंग रूम वापरण्याची शक्यता आहे. संघाच्या आध्यात्मिक विचारसरणीला अनुसरून हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, हॉटेल बदलण्यामागे काहीही चर्चा रंगली असली तरी आयसीसी प्रोटोकॉलनुसार, अहमदाबादमधील पहिला अंतिम फेरीत पोहोचणारा संघआयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये राहणार होता. या हॉटेलमध्ये भारतीय संघ 2023 वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात थांबला होता. तर दुसरा संघ ताज स्कायलाइनमध्ये राहील असं स्पष्ट होतं. पण ड्रेसिंग रूम बदलण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे, भारत आणि इंग्लंड सामन्याआधी झालेल्या सराव शिबिरात असं चित्र पाहायला मिळालं होतं. तेव्हा चंद्रग्रहणामुळे भारताने सराव उशिराने सुरू केला होता.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?