AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसप्रीत बुमराहचा सामना करणं का जातंय कठीण? टीम इंडियाच्या विजयानंतर खरं कारण आलं समोर

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्या पार पडला. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. या विजयात जसप्रीत बुमराहचं खरं योगदान ठरलं. कारण बुमराहमुळे हा विजय मिळवणं सोपं झालं.

जसप्रीत बुमराहचा सामना करणं का जातंय कठीण? टीम इंडियाच्या विजयानंतर खरं कारण आलं समोर
जसप्रीत बुमराहचा सामना करणं का जातंय कठीण? टीम इंडियाच्या विजयानंतर खरं कारण आलं समोरImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 06, 2026 | 5:59 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत अखेर टीम इंडियाने धडक मारली आहे. कारण उपांत्य फेरीचा सामना वाटतो तितका सोपा नव्हता. भारताने विजयासाठी 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना इंग्लंडने जीवाची बाजी लावली होती. प्रत्येक चौकार आणि षटकारानंतर धाकधूक वाढत होती. इंग्लंडने 246 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताला निसटता विजय मिळाला असं म्हणायला हरकत नाही. इंग्लंडच्या फलंदाजांना रोखताना भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आले होते. पण या जसप्रीत बुमराह हा अपवाद ठरला.. त्याचा सामना करताना इंग्लंडच्या फलंदाजांना खूपच कठीण गेलं. जसप्रीत बुमराहाने 4 षटकात 33 धावा दिल्या आणि एक विकेट काढली. शेवटच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक दिला. त्यामुळे शेवटच्या षटकांमध्ये इंग्लंडसमोर धावांच अंतर वाढलं.

जसप्रीत बुमराहला खेळणं इतकं कठीण का?

इंग्लंडसमोर भारताच्या सर्वच गोलंदाजांनी 9हून अधिक इकोनॉमी रेटने धावा खर्च केल्या. पण जसप्रीत बुमराहचा इकोनॉमी रेट हा 8.25 इतका होता. प्रत्येक फलंदाजांना माहिती आहे की, बुमराहचा सामना करणं सोपं नाही. पाटा विकेटवरही जसप्रीत बुमराह प्रभावी ठरला. याबाबत दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसी याने खुलासा केला आहे. ईएसपीएल क्रिकइंफोच्या शोमध्ये डुप्लेसी म्हणाला की, ‘बुमराहाची गोलंदाजी शैली फार वेगळी आहे. त्याची शैली समजणं कठीण आहे. त्याच्या हातून किती वेगाने चेंडू निघाला हे समजत नाही. त्याच्या स्किल आहे पण एक्शनचा फायदा मिळतो. असंच काहीसं लसिथ मलिंगाबाबत होतं. त्यांची गोलंदाजीची वेगळी शैली फलंदाजांना खेळणं कठीण जाते.’

डुप्लेसीने सांगितलं की, बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. इंग्लंडच्या डावाच्या पाचव्या षटकातील पहिला चेंडू जसप्रीत बुमराहने स्लोअर टाकला होता. त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक चाचपडला आणि शॉट खेळताना चुकला आणि झेल उडाला. अक्षर पटेलने त्याचा चांगला झेल पकडला आणि भारताला मोठी विकेट मिळवून दिली.

जसप्रीत बुमराहने 18व्या षटकात मोलाचं योगदान दिलं. इंग्लंडला 18 चेंडूत 45 धावांची गरज होती. या षटकात त्याने फक्त 6 धावा दिल्या आणि 12 चेंडूत 39 धावा अशी स्थिती आणली. डुप्लेसीने सांगितलं की, ‘त्या ओव्हरमध्ये फलंदाजांना माहिती होतं की फुल बॉल येणार किंवा स्लोअर येणार किंवा यॉर्कर येणार. दोन फुलटॉस त्या षकात आली पण सॅम करन शॉट खेळताना चुकला. दुसरा बॉलर असता तर या चेंडूवर षटकार खाल्ला असता. ‘

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?