AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ Final: अंतिम सामन्यात भारत-न्यूझीलंड संघ इतिहास रचणार, क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार

IND vs NZ Final, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ भिडणार आहे. हा अंतिम सामना विशेष असणार आहे. कारण या सामन्यात दोन्ही संघ एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. यापूर्वी दोन्ही संघांनी असं केलं नव्हतं.

IND vs NZ Final: अंतिम सामन्यात भारत-न्यूझीलंड संघ इतिहास रचणार, क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार
अंतिम सामन्यात भारत-न्यूझीलंड संघ इतिहास रचणार, क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणारImage Credit source: PTI
| Updated on: Mar 06, 2026 | 2:36 PM
Share

IND vs NZ Final, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहे. या दोन्ही संघापैकी एक संघ जेतेपदाचा मानकरी ठरणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 8 मार्चला खेळला जाणार आहे. भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडला 7 धावांनी पराभूत केलं. तर न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 9 गडी राखून पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आतापासून आहे. कारण भारत न्यूझीलंड हे संघ पहिल्यांदाच अंतिम सामन्यात भिडणार आहेत. त्यामुळे क्रिकेट इतिहासात याची नोंद होणार आहे.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार

गतविजेत्या भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा पहिला टी20 वर्ल्डकप जिंकण्याचा मानस आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला किंवा न्यूझीलंडने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला तरी त्याची नोंद इतिहासात होणार आहे. कारण आतापर्यंत कोणत्याही संघाने सलग दोनदा जेतेपद मिळवलेलं नाही. इतकंच काय तर यजमान संघ कधीच टी20 वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे, दुसरीकडे आयसीसीच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येण्याचा योग जुळून येणार आहे. यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड आयसीसी वनडे आणि कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भिडले आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 मध्ये भारताचा आयसीसी स्पर्धेत पहिल्यांदाच न्यूझीलंडशी सामना झाला होता. तेव्हा न्यूझीलंडने भारताला धोबीपछाड देत जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत दोन्ही संघ भिडले होते. तेव्हा भारताने न्यूझीलंडला 4 विकेटने पराभूत केलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने विजय मिळवला होता.

न्यूझीलंडचं कठीण आव्हान

अंतिम फेरीत न्यूझीलंडचं कठीण आव्हान भारतासमोर असणार आहे. कारण या स्पर्धेत न्यूझीलंडने जबरदस्त कामगिरी केली आहे. कारण भारतीय संघ या स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंडविरुद्ध एकही सामना जिंकू शकलेली नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले होते. तिन्ही वेळेस न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!