एका विकेटनंतर दिलेला सेंड-ऑफ महागात पडला! आयसीसीची भारतीय वेगवान गोलंदाजावर मोठी कारवाई, कोणती शिक्षा दिली?

ICC imposes sanction on Indian fast bowler Gurnoor Brar: न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात विकेट घेतल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने केलेला जल्लोष त्याला महागात पडला आहे.

एका विकेटनंतर दिलेला सेंड-ऑफ महागात पडला! आयसीसीची भारतीय वेगवान गोलंदाजावर मोठी कारवाई, कोणती शिक्षा दिली?
ICC Punishment Gurnoor Brar
| Updated on: Nov 17, 2026 | 5:50 PM

क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार हा माउंट माउंगानुई येथे न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आचारसंहितेच्या स्तर 1 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आहे. त्याच्या आक्रमक वृत्तीबद्दल आणि सेफर्टला दिलेल्या कठोर प्रत्युत्तराबद्दल आयसीसीने त्याला अधिकृतपणे फटकारले आहे. त्याच्या शिस्तभंगाच्या नोंदीत एक डिमेरिट पॉइंट जोडला आहे.

या सामन्यात भारतीय संघाला पहिले यश मिळवण्यासाठी 12 षटके वाट पाहावी लागली. अखेरीस गुरनूर ब्रारने टिम सायफर्टला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर गुरनूर ब्रार थेट टिम सायफर्टकडे गेला. आक्रमकपणे ओरडू लागला, ज्यामुळे वातावरण तापले. मैदानावर वाढणारा तणाव पाहून विराट कोहलीने तात्काळ धाव घेतली. गुरनूरला सायफर्टपासून वेगळे केले. हा जल्लोष फलंदाजाचा अपमान मानला गेला. त्यामुळे त्याने आक्रमक प्रतिक्रिया दिली.

Loading...

आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यानंतर आक्षेपार्ह पद्धतीने भाषा, कृती किंवा हावभाव वापरण्याशी संबंधित, खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याबद्दल ब्रार दोषी आढळला. गेल्या 24 महिन्यांतील गुरनूर ब्रारचा हा दुसरा शिस्तभंगाचा गुन्हा आहे. त्यामुळे त्याचे एकूण डिमेरिट पॉइंट्स दोन झाले आहेत.

आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनेलचे सदस्य, रंजन मदुगल्ले यांनी सुचवलेली शिक्षा गुरनूर ब्रारने स्वीकारली. आपला गुन्हा कबूल केला. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज टळली. आयसीसीच्या नियमांनुसार, स्तर 1 च्या गुन्ह्यांसाठी किमान शिक्षा म्हणून अधिकृत ताकीद, कमाल शिक्षा म्हणून सामना शुल्काच्या 50 टक्के दंड आणि खेळाडूच्या रेकॉर्डमध्ये एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स जोडले जातात.

जागतिक क्रिकेट संस्थेने म्हटले आहे की, ब्रारच्या कृतीमुळे तशीच आक्रमक प्रतिक्रिया भडकली असती. ब्रारने आपला गुन्हा कबूल केला होता, असं सांगितलं आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडकडून भारताला 244 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाने पाचवा आणि अंतिम सामना जिंकून एकदिवसीय मालिका 3-1 ने आपल्या नावावर केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us