Icc T20I World Cup 2024 साठी टीम इंडिया फिक्स! या खेळाडूंना संधी?

| Updated on: Feb 28, 2024 | 5:54 PM

T20I World Cup 2024 Team India | टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप मोहिमेला 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा आयर्लंड विरुद्ध यूएसएस येथे पार पडणार आहे.

Icc T20I World Cup 2024 साठी टीम इंडिया फिक्स! या खेळाडूंना संधी?
Follow us on

मुंबई | टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट क्रिकेट चाहत्यांची वर्ल्ड कप विजयाची प्रतिक्षा अजूनही कायम आह. टीम इंडियाला 2023 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याची सुवर्णसंधी होती. टीम इंडिया आणि वर्ल्ड कप ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया आडवी आली. टीम इंडियासमोर 2003 नंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनलमध्ये समोर आली. मात्र ज्याची भीती तेच झालं. ऑस्ट्रेलियाने 20 वर्षांनी पुन्हा एकदा टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे टीम इंडियाचं स्वप्न ऑस्ट्रेलियाने भंग केलं.

टीम इंडियाला त्यानंतर आता पुन्हा एकदा 3 महिन्यानंतर वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. येत्या जून महिन्यात टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा पार पडणार आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तरित्या करण्यात आलं आहे. टी 20 वर्ल्ड कप 1 ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे. रोहित शर्माच टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार असल्याचं काही दिवसांपूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी जाहीर केलं. त्यामुळे हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा या दोघांपैकी टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन कोण असणार? या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला.

आता टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा सामना हा 7 ते 11 मार्च रोजी धर्मशालेत आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडियाची ही वर्ल्ड कपआधी अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. त्यानंतर टीम इंडिया थेट टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपमध्ये कुणाला संधी मिळणार, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

आयपीएलच्या 17 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत विविध देशातील अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. वर्ल्ड कपआधी आयपीएल पार पडणार आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये धमाका करुन टी 20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये एन्ट्रीसाठी दावा करण्याची संधी आहे. अशात आपण आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारावर टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कपसाठी संभाव्य संघ कसा असू शकतो, हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील सामन्याचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, 5 जून

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 9 जून

टीम इंडिया विरुद्ध यूएएसए, 12 जून

टीम इंडिया विरुद्ध कॅनेडा, 15 जून

टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी संभाव्य टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, ईशान किशन केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , रवींद्र जडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह.