AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs ITA : एकाच सामन्यात 8 शिकार, गोलंदाजाचा Super 8 आधी कहर, विंडीजचा दणदणीत विजय

Icc T20 World Cup 2026: वेस्ट इंडिजसाठी सुपर 8 मध्ये पोहचल्याने इटली विरुद्धचा सामना हा औपचारिकता होता. मात्र विंडीजने इटलीवर मात करत विजयी घोडदौड कायम राखली.शामर जोसेफ हा विंडीजच्या विजयाचा हिरो ठरला.

WI vs ITA : एकाच सामन्यात 8 शिकार, गोलंदाजाचा Super 8 आधी कहर, विंडीजचा दणदणीत विजय
Shamar Joseph and Shai Hope West IndiesImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 19, 2026 | 5:10 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 साठी 8 संघ निश्चित झाले आहेत. तर साखळी फेरीतील शेवटचे काही सामने खेळवण्यात येत आहेत. गुरुवारी 19 फेब्रुवारीला साखळी फेरीतील पहिल्या आणि स्पर्धेतील 37 व्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध इटली हे 2 संघ आमनेसामने होते. विंडीजने कोलकातातील इडन गार्डन्समध्ये झालेल्या या सामन्यात इटलीवर मात केली. विंडीजने या विजयासह साखळी फेरीत विजयी चौकार लगावला. तर इटली आपल्या मोहिमेचा विजयी शेवट करण्यात अपयशी ठरली. विंडीजने इटलीसमोर 166 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इटलीला प्रत्युत्तरात 18 ओव्हरमध्ये ऑलआऊट 123 धावांपर्यंतच मजल मारता आली. विंडीजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफ याने या सामन्यात बॉलिंग आणि बॅटिंगने कहर केला कहर.

शामरने या सामन्यात बॉलिंग आणि फिल्डिंगने इटलीचं कंबरडं मोडलं. शामरने बॉलिंग आणि फिल्डिंगद्वारे दुहेरी योगदान दिलं. शामर यासह विंडीजच्या विजयाचा हिरो ठरला. शामरने नक्की काय केलं आणि सामन्यात सुरुवातीपासून विजयापर्यंत काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

सामन्याचा धावता आढावा

इटलीच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून राक्षसी बॅटिंग करणाऱ्या विंडीजला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. विंडीजला इटलीसमोर त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशी धावसंख्या उभारता आली नाही. इटलीने विंडीजला 165 धावांवर रोखण्यात यश मिळवलं.

विंडीजसाठी शाई होप याने सर्वाधिक धावा केल्या. तर रोस्टन चेज आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनी निर्णायक योगदान दिलं. होपने 46 बॉलमध्ये 75 रन्स केल्या. होपने 75 पैकी 36 धावा (6 सिक्स) या षटकरांच्या मदतीने केल्या. तसेच होपने 4 चौकार लगावले. तर चेस आणि रुदरफोर्ड या दोघांनी प्रत्येकी 24-24 धावा केल्या. तर इटलीसाठी दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

शामर जोसेफचा इटलीला दणका

त्यानंतर शामर जोसेफ याने धारदार बॉलिंगच्या जोरावर 166 धावांचा पाठलाग करणाऱ्या इटलीला दणका दिला. शामरने घेतलेल्या 4 विकेट्सच्या जोरावर विंडीज इटलीला 18 ओव्हरमध्ये 123 धावांवर गुंडाळण्यात यशस्वी ठरली. शामरने आपल्या 4 ओव्हरच्या कोट्यात 30 धावा दिल्या. शामरने या 30 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स मिळवल्या. तर शामरने इटलीच्या 4 फलंदाजांना कॅच आऊट केलं. शामरने 4 झेल घेतले. शामरने अशाप्रकारे 8 विकेट्स घेण्यात योगदान दिलं. एका खेळाडूने 8 विकेट्स घेण्यात योगदान देण्याची ही दुर्मिळ घटना घडली.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा