INDW vs WIW : टीम इंडिया चाचणी परीक्षेत पास, वर्ल्ड कपआधी विंडीजवर सराव सामन्यात 26 धावांनी विजय

West Indies Women vs India Women Warm Up Match Result: वुमन्स टीम इंडियाने विंडीजसमोर 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे विंडीजला विजयासाठी 9 च्या रनरेटने धावांची गरज होती. मात्र महिला ब्रिगेडने हा सामना 26 धावांनी जिंकला.

INDW vs WIW : टीम इंडिया चाचणी परीक्षेत पास, वर्ल्ड कपआधी विंडीजवर सराव सामन्यात 26 धावांनी विजय
INDW vs WIW Warm Up Match Result
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 09, 2026 | 1:32 AM

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 12 जून ते 5 जुलै दरम्यान एकूण 12 संघात 33 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहे. त्याआधी 6 ते 10 जून दरम्यान 12 सराव सामने खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने सराव सामन्यात विजय मिळवला आहे. वुमन्स टीम इंडियाने सराव सामन्यात वेस्ट इंडिजवर 26 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 153 धावा करता आल्या. अशाप्रकारे भारताने सराव सामन्यात विजयी सलामी दिली. स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली.

सामन्यात काय झालं?

वेस्ट इंडिजने टॉस जिंकला. कॅप्टन हॅली मॅथ्यूज हीने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने या संधीचा फायदा घेतला. टीम इंडियाच्या सलामी जोडीने भारताला आश्वासक सुरुवात मिळवून दिली. तर मधल्या फळीत यास्तिका भाटीया आणि भारती फुलमाळी यांनी उल्लेखीय कामगिरी केली. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या दोघांनी 59 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर दोघी सलग सहाव्या आणि सातव्या ओव्हरमध्ये आऊट झाल्या.

भारती फुलमाळीची झुंजार खेळी

स्मृतीने 23 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. स्मृतीने या खेळीत 8 चौकार लगावले. तर शफालीने 29 धावांचं योगदान दिलं. जेमीमाह रॉड्रिग्स हीने निराशा केली. जेमीने 7 धावा केल्या. त्यानंतर यास्तिका भाटीया आणि भारती फुलमाळी या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 44 बॉलमध्ये 61 रन्सची पार्टनरशीप केली. यास्तिका भाटीया आऊट झाल्याने ही भागीदारी मोडीत निघाली. यास्तिकाने 26 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. मात्र त्यानंतर ऋचा घोष (0),राधा यादव (1), श्रेयांका पाटील (2) आणि क्रांती गौड (4) अशा धावा केल्या. तर श्री चरणी आणि भारती या दोघी नाबाद परतल्या. श्रीने 2 धावा केल्या. तर भारतीने सर्वाधिक धावा केल्या. भारतीने 40 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 56 रन्स केल्या. तर विंडीजसाठी अफी फ्लेचर हीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या.

विंडीजची बॅटिंग

डिएंड्रा डॉटीन आणि शेमेन कॅम्पबेल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी करुन विंडीजला चांगली सुरुवात मिळवून दिली. मात्र या दोघींव्यरिक्त एकीलाही संघाला विजयी करण्यासाठी मोठी खेळी करता आली नाही. शेमेन हीने 25 धावा केल्या. त्यानंतर भारताने एकाच ओव्हरमध्ये विंडीजला 2 झटके दिले. तर भारताने डॉटीनच्या रुपात विंडीजला चौथा आणि मोठा झटका दिला. डॉटीनने 49 धावा केल्या. त्यानंतर एकीलाही भारतीय गोलंदाजांसमोर काही खास करता आलं नाही. भारताने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये विंडीजला 8 आऊट 153 रन्सवर रोखलं. भारतासाठी श्रेयांका पाटील हीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर राधा यादव हीने तिघांना बाद केलं.

Follow Us