
मुंबई: पाकिस्तानने T20 वर्ल्ड कपसाठी आपल्या टीमची घोषणा केली आहे. 23 ऑक्टोबरला पाकिस्तानी टीम वर्ल्ड कपमधील अभियान सुरु करणार आहे. बाबर आजमकडे या टीमच नेतृत्व आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानचा पहिला सामना होणार आहे. पाकिस्तानने सर्वात शेवटी आपली टीम जाहीर केली. पाकिस्तानी टीमच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. फखर झमन, शोएब मलिक यांना स्थान न दिल्याने गदारोळ सुरु आहे. आता आणखी एका पाकिस्तानी प्लेयरने बाबर आजमला चुकीच सिद्ध केलं आहे.
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानने टीम निवडली. पण त्यांनी ऑलराऊंडर इमाद वसीमकडे दुर्लक्ष केलय. टीमचं सिलेक्शन झालं, त्याचदिवशी इमादने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने आपल्या कामगिरीने पाकिस्तानी टीमच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय.
इमाद वसीम सीपीएलच्या या सीजनमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे. त्याने 7 मॅचमध्ये 10 विकेट घेतल्यात. लीगच्या 15 व्या सीजनमध्ये तो जमैका तलवाह टीमकडून खेळला. त्याने बारबाडोस रॉयल्स विरुद्ध 3 ओव्हरमध्ये 14 धावा देऊन 3 विकेट काढल्या. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्या बळावर जमैकाने 6 रन्सनी हा सामना जिंकला.
इमाद बऱ्याच काळापासून राष्ट्रीय संघाबाहेर आहे. टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानकडून तो शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून इमाद टीमबाहेर आहे. मागच्यावर्षीपासूनच त्याचा खराब फॉर्म सुरु झाला.
पाकिस्तान सुपर लीगच्या मागच्या सीजनमध्ये त्याने कराची टीमच नेतृत्व केलं होतं. त्यानंतर त्याला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं. त्याच्याजागी बाबर आजमकडे टीमचं नेतृत्व सोपवलं. इमाद वसीम तेव्हापासून नॅशनल टीमच्या बाहेर आहे. त्याने 41 सामन्यात कराचीच नेतृत्व केलं. यात 20 सामने जिंकले, 17 मॅचमध्ये पराभव झाला.
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीची स्तुीत केल्यामुळे इमाद वसीम अडचणीच आला होता. आशिया कपमधील विराटच्या शानदार शतकानंतर इमादने टि्वट केलं होतं. पृथ्वीवरचा शानदार खेळाडू फॉर्ममध्ये परतलाय, असं त्याने म्हटलं होतं. इमादकडून विराटची स्तुती पाकिस्तानी चाहत्यांना सहन झाली नाही. त्यांनी इमादला ट्रोल केलं.