AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs SRH : कोलकाता आणि हैदराबादपैकी वरचढ कोण? आकडे कुणाच्या बाजूने?

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Head To Head Record : आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील पाचव्या सामन्यात 2 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांपैकी कोण वरचढ आहे? हे जाणून घेऊयात.

KKR vs SRH : कोलकाता आणि हैदराबादपैकी वरचढ कोण? आकडे कुणाच्या बाजूने?
Kolkata Knight Riders vs Sunrisers HyderabadImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 02, 2026 | 5:20 AM
Share

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील पाचव्या सामन्यात 2 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना असणार आहे. केकेआर आणि हैदराबाद दोन्ही संघ या 19 व्या मोसमात ड्रीम सुरुवात करण्यात अपयशी ठरले. दोन्ही संघांना आपल्या सलामीच्या सामन्यात 200 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. आरसीबीने हैदराबादवर 6 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईनेही अशाच अंदाजात विजय साकारला.

केकेआर-हैदराबादपैकी वरचढ कोण?

आता गुरुवारी 2 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा या सामन्यात विजयाचं खातं उघडून कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. उभयसंघातील हा एकूण 31 वा सामना असणार आहे. या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांपैकी कोण वरचढ आहे? हे जाणून घेऊयात. कोलकाता नाईट रायडर्सने याआधी उभयसंघात झालेल्या 30 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. केकेआरने हैदराबादला 30 पैकी 20 सामन्यांमध्ये पराभवाची धुळ चारली आहे. तर हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 10 सामने जिंकण्यात यश आलं आहे.

18 व्या मोसमातील कामगिरी

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद याच्यांत गेल्या मोसमात एकूण 2 सामने खेळवण्यात आले आहेत. केकेआरने यापैकी 1 सामना जिंकला होता. तर 1 सामना सनरायजर्स हैदराबादने आपल्या नावावर केला होता.

केकेआरची घरच्या मैदानात हैदराबाद विरुद्ध कामगिरी कशी?

केकेआर विरुद्ध एसआरएच यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. उभयसंघातील सामना केकेआरच्या होम ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. इडन गार्डन्समध्ये यंदाच्या मोसमातील हा केकेआरचा पहिलाच होम गेम असणार आहे. त्यामुळे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत. केकेआरची घरच्या मैदानात कामगिरी कशी राहिली आहे, हे आपण जाणून घेऊयात.

केकेआर घरच्या मैदानातही सरस

कोलकाता विरुद्ध हैदराबाद यांच्यात इडन गार्डन्समध्ये एकूण 11 सामने खेळवण्यात आले आहेत. केकेआरने या 11 पैकी 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबादला फक्त 3 सामन्यांमध्येच कोलकाता विरुद्ध विजय मिळवण्यात यश आलं आहे. हैदराबादने इडन गार्डन्समध्ये 2023 साली शेवटचा सामना जिंकला होता. त्यानंतर आता हैदराबाद जिंकणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा