AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs SRH Live Streaming : कोलकाता-हैदराबाद दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज, कोण उघडणार विजयाचं खातं?

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live Scorecard : कोलकाता आणि हैदराबाद दोन्ही संघ विजयी सलामी देण्यात अपयशी ठरले. त्यानंतर आता गुरुवारी दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत.

KKR vs SRH Live Streaming : कोलकाता-हैदराबाद दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज, कोण उघडणार विजयाचं खातं?
KKR vs SRHImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 01, 2026 | 10:46 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील दुसऱ्या फेरीला गुरुवार 2 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या दुसऱ्या फेरीतील पहिल्या आणि 19 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना असणार आहे. इशान किशन हैदराबादचं तर अजिंक्य रहाणे केकेआरचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांनी आपला सलामीचा सामना गमावला आहे. त्यामुळे गुरुवारी दोन्ही संघापैकी कोण आपलं विजयाचं खातं उघडणार? हे स्पष्ट होईल. या निमित्ताने केकेआर विरुद्ध एसआरएच सामन्याबाबत जाणून घेऊयात.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कधी?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना गुरुवारी 2 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कुठे?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना इडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

हैदराबादला 28 मार्चला मोसमातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या आरसीबीकडून 8 विकेट्सने पराभूत व्हावं लागलेलं. तर मुंबई इंडियन्सने रविवारी 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन तब्बल 14 वर्षांनंतर मोहिमेत विजयी सुरुवात केली होती. अशाप्रकारे हैदराबाद आणि केकेआरला आपला पहिला सामना गमावला. त्यामुळे आता दोघांपैकी कोणता संघ जिंकणार आणि कुणाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा