AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : पहिल्या सामन्यात जे नाही घडलं ते दुसऱ्या सामन्यात होणार, श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूचे भारताला आव्हान

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या बहुतांश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर गुडघे टेकल्याने ते मोठा स्कोर बनवू शकले नाहीत. मात्र दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचे खेळाडू नव्याने सुरुवात करणार हे नक्की

IND vs SL : पहिल्या सामन्यात जे नाही घडलं ते दुसऱ्या सामन्यात होणार, श्रीलंकेच्या 'या' खेळाडूचे भारताला आव्हान
चामिका करुणारत्ने
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 12:23 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका (Sri Lanka Cricket Team) संघाचा दारुण पराभव केला. भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही प्रकारात श्रीलंकेला धोपीपछाड केलं. श्रीलंका संघाने केलेली दिलासादायक सुरुवात ते एका मोठ्या धावसंख्येत बदलू शकले नाही. केवळ 262 धावाचेचं लक्ष भारतीय संघाला श्रीलंकेने दिले. जे भारताने 7 गडी राखत पूर्ण केले आणि श्रीलंका संघावर विजय मिळवला. पण दुसऱ्या वनडेमध्ये श्रीलंका संघ पहिल्या सामन्यात न करु शकलेला एक मोठा स्कोर नक्कीच करेल असा विश्वास चामिका करुणारत्ने (Chamika Karunaratne) याने दर्शवत जणू भारतीय संघाला आव्हानच दिले आहे.

श्रीलंकेने दिलेले 263 धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या 36.4 ओव्हरमध्ये केवळ तीन विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेतही 1-0 ची आघाडी घेतली. सामन्यात भारताचा कर्णधार शिखर धवनने नाबाद 86 धावांची खेळी केली. तर युवा फलंदाज इशान किशनने 59 आणि पृ्थ्वी शॉने 24 चेंडूत 43 धावा ठोकत मॅन ऑफ द मॅचचा सन्मान मिळवला.

300 चे पार लक्ष्य

करुणारत्ने याने सामन्यानंतर बोलताना सांगितले की, श्रीलंका संघात 300 ते 350 धावा बनवण्याचे सामर्थ्य आहे.  दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आम्ही हेच लक्ष ठेवून खेळू असंही तो म्हणाला. मीडियाशी बोलाताना तो म्हणाला, “आमच्या काही फलंदाजानी चांगली सुरुवात  केली खरी पण पुढील फलंदाज ती सुरुवात कायम ठेवू शकले नाहीत. मी कर्णधार दासुनला 42 आणि 43 व्या ओव्हरमध्ये मोठे शॉट्स खेळूका असे विचारले देखील होते. पण त्याने 45 ओव्हरनंतर खेळण्याचा सल्ला दिला. आमचे इतरही फलंदाज चांगली खेळी करु शकले असते तर आम्ही नक्कीच 300 ते 350 स्कोर करु शकलो असतो.”

हे ही वाचा :

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

पृथ्वीचा लंकेला तडाखा, धमाकेदार खेळीनंतर सेहवागचं ‘ते’ ट्विट व्हायरल, रवी शास्त्रींची घेतली मजा!

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

(In second India vs Sri Lanka ODI Match team sri lanka will Score 300 plus score says chamika karunaratne )

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....